एक्स्प्लोर

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; मुख्यमंत्री म्हणाले बरं झालं, ज्यांनी हसीना पारकर...

Cm Eknath Shinde On Ajit pawar : उद्यापासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला.

मुंबई : उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधीवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधी सरकारच्या चहापानावर विरोधकांनी आज बहिष्कार घातला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कडक शब्दात उत्तर दिले असून त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केलीय. "आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. परंतु, दाऊदची बहीण हसीना पारकरला चेक दिलेले त्यांचे सहकारी मंत्री जेलमध्ये गेले, त्यांनी देशद्रोह केला. परंतु, त्यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळं बर झालं ते चहापानाला आले नाहीत. नाही तर आम्हाला त्यांच्या सोबत चहा प्यायला लागला असता, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. 

उद्यापासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. "सत्तेतून बाहेर गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी माझ्या निष्ठेवर प्रश्न निर्माण केला. मात्र त्यांनी एकाच दिवसात तीन वेळा भूमिका बदलली. मी तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. हे कधीपासून कडवट शिवसैनिक झाले?  सभागृहात त्यांचा आम्ही समाचार घेऊच. नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं, केतकी चितळेला तुरूंगात टाकलं, कंगना रणौतचं घर तोडलं. गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस यांना तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, आमच्यावर आता खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्हाला लोकांचं प्रेम मिळत आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात दुखत आहे. वर्षा बंगल्यावर लोक भेटायला आल्यानंतर त्यांना चहापाणी द्यायला पाहिजे का नको? ही आपली संस्कृती आहे. परंतु, यावरून अजित पवार आरोप करत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.    

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "लोकांची नाराजी आहे म्हणून एवढे सरपंच निवडून आले का? रोज कानाकोपऱ्यात प्रवेश होत आहे म्हणून त्याचं पोट दुखतंय. माझं कुटुंब माझी जबाबदारी यावर किती खर्च केला त्यांनी. त्यांच्या काळात 245 कोटी रूपये खर्च केला होता. यातील त्यांच्या वैयक्तीक जाहिरातीसाठी सहा कोटी रूपये वापरले. मात्र बोंबाबोंब झाल्यावर त्यांनी माघार घेतली. दोन वर्ष वर्षा बंगला बंद होता. त्यामुळे लोक येतात, आलेल्या लोकांना चहा देतो,  आम्ही बिर्याणी देत नाही. तुम्ही 70 हजार कोटी रुपये सिंचनाचे बुडवले आहेत. त्याचा ही हिशोब द्यावा लागेल, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.  

महत्वाच्या बातम्या 

लोकायुक्त विधेयक पास करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावं; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन 

महत्त्वाच्या बातम्या

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं

Embed widget