Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाजवळ अजित पवार गटाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी; सूत्रांची माहिती
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अजित पवार गटाकडून मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात आलं. याच आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून मंत्रालयात करण्यात आलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. दरम्यान मराठा आरक्षणासाठी अजित पवार गटाकडून मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं. याच आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या आमदारांनी मंत्रालयात प्रवेश करणाऱ्याला गेटलाच टाळं ठोकलं होतं. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली होती. या आंदोलकांनी मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आमदारांचे उपोषण सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं ?
दरम्यान अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं की, सत्तेत असताना अशी आंदोलन करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनीच अशी आंदोलनं केली तर चुकीचा संदेश जाऊ शकतो. मंत्रालयात असं आंदोलन करणही योग्य नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अशा आंदोलनामुळे महायुतीत समन्वय नसल्याचा मेसेज देखील जाऊ शकतो. महायुती म्हणून अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र राहायला हवं.
महायुतीच्या बैठकीत 'या' मुद्द्यांवर चर्चा
महायुतीच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कुठली कामं करत आहेत यासंदर्भातील माहिती आमदार, खासदारांना देण्यात आली आणि त्यांना मार्गदर्शन देखील केले गेले. सत्तेत राहून सरकारच्या विरोधात कुठलीही भूमिका घेऊ नका असं आवाहन देखील या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आमदार खासदारांना केलं. तसेच आरक्षणाबरोबरच येणाऱ्या निवडणुकीसाठी देखील कामाला लागण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. पण तर सरकारकडून गेलेल्या शिष्टमंडळात देखील महायुतीमध्ये असलेल्या महत्त्वाच्या पक्षातील नेत्यांचा सहभाग होता. पण अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या.