कैलास गोरंट्याल-अर्जुन खोतकरांमध्ये कलगितुरा; खोतकर म्हणतात गोरंट्याल म्हणजे, गटारगंगा
Arjun Khotkar on Kailash Gorantyal: काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांच्यात वाकयुद्ध रंगलय, गोरंट्याल यांनी काल केलेल्या टीकेला अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Arjun Khotkar on Kailash Gorantyal: काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Congress MLA Kailash Gorantyal) आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यात वाकयुद्ध रंगलय, गोरंट्याल यांनी काल केलेल्या टीकेला अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस (Congress) आमदार कैलास गोरंट्याल म्हणजे, गटारगंगा असून लवकरच नगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार, असा इशारा अर्जुन खोतकरांनी दिला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. फाटलेले कपडे घालून तुम्ही सायकलवर फिरत होतात, ठाकरे परिवारामुळे तुम्ही मोठे झालात, अशी टीका काल कैलास गौरंट्याल यांनी केली होती. याच टिकेला उत्तर देताना अर्जुन खोतकरांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते कैलास गोरंट्याल?
तुम्ही स्वार्थासाठी पार्टी सोडून गेलेले आहेत. तुम्हाला काय मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली. ज्या ठाकरे परिवारामुळे तुम्ही मोठे झालात. तुम्ही सायकलवर फिरत होता, आज कुठं पोहचलात ते केवळ ठाकरे कुटुंबामुळे आणि आज त्यांना धोका देऊन तुम्ही केवळ नाक्यासाठी जातात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. स्वार्थासाठी कुठही जाणार का? उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर पाया पडून परत येणार का?” असं कैलास गोरंट्याल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
काय म्हणाले अर्जुन खोतकर?
"अरे ही गटारगंगा आहे, अशा लोकांवर काय बोलायचं? त्यांच्यावर बोलून मला माझं तोंड खराब नाही करायचं. गटारगंगा त्यांच्या तोंडात आहे. ते बोलतील त्यांना काय बोलायचं ते. मी लोकांवर काहीच टिका-टिप्पणी करणार नाही. लोकांना माहीत आहे मी काय आहे? जन्मतःच मी 300 एकरचा मालक आहे. काय सांगतात आम्हाला? यांची प्रकरणं काढतो आता आम्ही.", असं अर्जुन खोतकर बोलताना म्हणाले.