एक्स्प्लोर
औरंगाबादचे पोलिस आयुक्त सक्तीच्या रजेवर, मुख्यमंत्र्यांची घोषणा
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं होतं. मिटमिटा आणि पडेगावमध्ये कचऱ्याच्या गाड्या पेटवल्याने पोलिसांनी गावकऱ्यांच्या घरावर दगडफेक केली होती.
औरंगाबाद : कचराकोंडीवरुन विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात याची घोषणा केली.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं होतं. मिटमिटा आणि पडेगावमध्ये कचऱ्याच्या गाड्या पेटवल्याने पोलिसांनी गावकऱ्यांच्या घरावर दगडफेक केली होती.
यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस आयुक्तांवर कारवाईची मागणी उचलून धरली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करत पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
पोलिस महानिरीक्षकांकडे आयुक्तपदाचा भार
"विरोधकांनी कचराप्रश्नी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि पोलिस महासंचालक यांची समिती दगडफेकीची चौकशी करेल. तोपर्यंत औरंगाबादच्या पोलिस महानिरीक्षकांकडे आयुक्तपदाचा भार देण्यात येईल," असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं.
कचराकोंडीचा 28वा दिवस
औरंगाबादमधील कचराकोंडीचा आज 28 वा दिवस आहे. मात्र अजूनही हा प्रश्न निकाली निघालेला नाही. नारेगावातील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे औरंगाबादेत अभूतपूर्व कचराकोंडी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य औरंगाबादमध्ये पसरलं आहे.
औरंगाबाद कचराप्रकरणी कोर्टाचा निर्णय
'यापुढे नारेगावात कचरा टाकू नये,' असा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठाने काही दिवसांपूर्वीच दिला. कोर्टाच्या या निर्णयाने नारेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नारेगावातील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे औरंगाबादेत अभूतपूर्व कचराकोंडी झाली आहे. याच प्रकरणी नारेगावमधील नागरिकांनी याचिकाही दाखल केली होती. त्याच याचिकेवर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयाबरोबर कोर्टाने पालिकेलाही इतर 10 सूचना दिल्या आहेत.
संबंधित बातम्या :
‘यापुढे नारेगावात कचरा टाकू नये’, औरंगाबाद कचराप्रकरणी कोर्टाचा निर्णय
पोलिसांकडूनच नागरिकांवर दगडफेक, शिवसेना आमदाराचे गंभीर आरोप
औरंगाबाद कचरा प्रश्न : आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
औरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण, ग्रामस्थांकडून पोलिसांवर दगडफेक
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा
डम्पिंग ग्राऊंडसाठी जमीन देणार नाही: मुख्यमंत्री
18व्या दिवशीही औरंगाबादमधील कचराकोंडी कायम
औरंगाबादेतील कचराकोंडीचा 17 वा दिवस, आमदार सावेंची गाडी अडवली
औरंगाबादचा कचरा, गावकऱ्यांनी कचऱ्याची गाडी फोडली
कचराप्रश्न पेटलेल्या औरंगाबादेतील दोन चकचकीत वॉर्ड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement