एक्स्प्लोर

लाडकी बहीण सुरुच ठेवणार, 2100 रुपये देणार, निकषाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करु : देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे सांगितले .

CM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींवर काही निर्णय होतो का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असताना मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं सांगितलंय . महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या  निकालानंतर 12 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली . निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांऐवजी 2100 महिलांना देऊ असा आश्वासन महायुतीने प्रचारादरम्यान दिलं होतं . लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी .2100 रुपये देणार असल्याचं पत्रकार परिषदेत ते म्हणाले आहेत . 'बजेटच्या वेळेस यासंदर्भात विचार करू . आमचे आर्थिक स्त्रोत यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार' असल्याचं फडणवीस म्हणाले . 

लाडकी बहीण योजना सुरुच राहणार- देवेंद्र फडणवीस

'जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करू . ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी करू . निकषाच्या बाहेर कोणी भेटला , तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचार ही करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले . शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला जे लाभार्थी होते . तेव्हाही लक्षात आलं होतं की मोठ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय . नंतर अनेक शेतकऱ्यांनीच सांगितलं आम्ही निकषात बसत नाही . त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल', पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचं कारण नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले .

 

निकषाबाहेर असणाऱ्या अर्जांचा पुर्नविचार करणार

लाडकी बहीण योजनेचे पैसे गरजवंतांना मिळावे यासाठी या योजनेत पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असून गरजू महिलांनाच अर्थसहाय्य मिळावे यासाठी पडताळणी केली जाणार असल्याचं नुकतच सांगण्यात आलं होतं . राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता. निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला होता त्या त्या सर्व महिलांना दर महिन्याला  रु1500 पयांचा हप्ता दिला गेला. त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्ता आल्यास 2100 रुपयांचा हप्ता देऊ, असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. हे पैसे गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात असल्याची वृत्त येत होती.  आता मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण सुरुच ठेवणार असल्याचं सांगत 2100 रुपये देणार असल्याचंही सांगितलंय. योजनेत ज्या महिला निकषाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करणार असल्याचं सांगितलंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Pushpa 2 Actress Sreeleela : पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Meet Amit Shah : अमित शाहांशी ऊसाच्या प्रश्नावर चर्चेसाठी आलो - अजित पवारDevendra Fadnavis meet PM Narendra Modi : देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोदींची भेटCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP MajhaRohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Pushpa 2 Actress Sreeleela : पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावती, भिवंडीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Embed widget