एक्स्प्लोर
चेक बाऊन्स झाल्यास आम्ही 10 हजार देऊ : मुख्यमंत्री
मुंबई: जुन्या नोटांसाठी रुग्णांना ताटखळत ठेवू नये. खासगी रुग्णालयांनी चेक स्वीकारावे, जर हे चेक्स बाऊन्स झाले तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 हजार रुपयांची मदत करण्याची तरतूद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अशा जिकीरीच्यावेळी लोकांची मदत करणं यापेक्षा मोठी देशभक्ती नसेल, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
बाल दिनानिमित्त मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमधील नवजात बालकासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन एनआईसीयूचं मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आरोग्य मंत्री दीपक सावंत ,मनपा उपायुक्त एस कुंदन आणि उपमहापौर अलका केरकर उपस्थित होते.
दरम्यान गोवंडी प्रकरणाबाबत आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती गठित करण्यात आली आहे, ते याबाबत अहवाल देतील, त्यानंतर सरकार कारवाई करेल, असं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वीच गोवंडीतील रुग्णालयात अनामत रक्कम म्हणून पाचशेच्या नोटा न स्वीकारल्यानं एका नवजात बालकाचा मृत्यू झाला. त्याबाबत सरकारने आता चौकशी समिती नेमली आहे.
नोटांअभावी उपचार नाकारणाऱ्या आणि चेक्स न विकारणाऱ्या रुग्णांच्या सहाय्यतेसाठी 104 आणि 108 हेल्पलाईन नंबर उपलब्ध आहे, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
500च्या नोटा नाकारल्यानं अर्भकानं जीव गमावला, डॉक्टरांनी आरोप फेटाळले
यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?
सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ
बँकांबाहेर चार स्वतंत्र रांगा, तर मेडिकलमध्ये जुन्या नोटा चालणार
काळा पैसावाले झोपेच्या गोळ्या खात आहेत : मोदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement