एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांची राजकीय वारी, परिचारकांकडे भोजन, कल्याणराव काळेंकडे चहा, भालकेंकडे फराळ

विधानसभेचे वारे काही दिवसात वाहू लागणार असल्याने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चाणाक्षपणा दाखवला आणि राजकीय गणितं मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वारीही केली. आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे भोजन, कल्याणराव काळे यांच्याकडे चहा, तर काँग्रेस आमदार भारत भालके यांच्याकडे फडणवीसांनी फराळ करत राजकीय गणितं मांडली. विधानसभेचे वारे काही दिवसात वाहू लागणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर दौऱ्यात चाणाक्षपणा दाखवला. अनेकांना खुश करत राजकीय गणितं मजबूत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आषाढी एकादशीच्या दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री दशमीला सोलापुरात उतरले आणि तिथेच काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके स्वागताला हजर होते. यानंतर पंढरपूरमध्ये विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या बाजार समितीमधील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. परिचारकांकडे रात्री भोजनाचा आणि पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या गायनाचा सपत्नीक आस्वाद घेतला. या कार्यक्रमात माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांची उपस्थिती आश्चर्यकारक होती. याच ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेतेही सहभागी झाले होते. एकादशीला विठुरायाच्या पूजेनंतर सकाळी पहिल्यांदा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कल्याणराव काळे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी चहापान केले. यावेळी बोलताना काळे यांनी केलेल्या मागण्या पाहता हा चहा आपल्याला फारच महागात पडल्याची मिश्किल कोटीही त्यांनी केली. याच कार्यक्रमात माढ्याचे नूतन खासदार रणजित निंबाळकर यांनी बारामतीने नेलेले हक्काचे पाणी परत आणल्याचे सांगितले. या पाण्याचे वाटप आता सांगोला, माढा, पंढरपूरसह गरज असलेल्या भागाला करणार असल्याचं म्हणत बारामतीकरांनाही टोला लगावला. काळे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी जाऊन फराळाचा आस्वाद घेतला. नुकतेच भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत भाजपच्या संपर्कात असलेल्या आमदारांची त्यांनी भेट घेतली. या यादीत भालके यांचंही नाव चर्चेत असल्याने विखे पाटील मुख्यमंत्र्यांना भालके यांच्या निवासस्थानी घेऊन गेले. यावेळी भालके यांनी आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्याचे सांगत काही राजकीय चर्चा करायची असती, तर त्या गुप्त बैठकीत केली जाते आणि यासाठी मुंबईत भरपूर जागा असल्याचं सांगत सुरु असलेल्या चर्चेला पुष्टी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे तापाने फणफणले, 102 इतका ताप, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
मनोज जरांगे तापाने फणफणले, 102 इतका ताप, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget