एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, अधिवेशन रद्द करण्याचा विचार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठकीत घेतला. सध्या सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा विचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल आणि डीजी दत्ता पडसलगीकर उपस्थित होते. मुंबई आणि महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सध्या सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या राज्याच्या अधिवेशनाच्या बंदोबस्तात पाच हजार पोलिस तैनात आहेत. याशिवाय अधिवेशनावर येणाऱ्या मोर्चांसाठी 1500 पोलिसांचा बंदोबस्त आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पोलिस बंदोबस्त इतरत्र वापरता यावा यासाठी अधिवेशन रद्द करण्याचा विचार सुरु आहे. VIDEO | पाकिस्तानच्या एफ-16 विमानाच्या अशा झाल्या चिंधड्या अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार विधानभवनात परिसरात असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो. सर्व व्हीआयपी एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील होत असल्याचंही म्हटलं जात आहे. 20 लाख रोजगार, 3 लाख 36 हजार कोटींचा एफडीआय, महाराष्ट्राचं बजेट सादर यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विधिमंडळात बोलवण्यात आली आहे. सर्वांशी चर्चा करुन अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. देशातील परिस्थिती पाहता अधिवेशन उद्याच रद्द करण्याची सरकारी पक्षाचीही भूमिका आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर























