एक्स्प्लोर
मराठा आरक्षणावर थेट जनतेशी संवाद, काय बोलणार मुख्यमंत्री?
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गेली दोन वर्षे शांततेत मूक मोर्चे काढमाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता ‘ठोक मोर्चे’ सुरु केले आणि यातून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला.

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चाललेलं असताना, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जनतेशी संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी 7.30 वाजता आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री बोलतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणावर आता काय भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गेली दोन वर्षे शांततेत मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता ‘ठोक मोर्चे’ सुरु केले आणि यातून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील काही ठिकाणी मराठा समाज आक्रमकही झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सरकारी पातळीवरील हालचालीही वेगवान झाल्या. त्यानंतर विरोधी पक्षांसह सरकार दरबारीही बैठकांवर बैठका होऊ लागल्या. मराठा समाजाला शांतता बाळगण्याच्या आश्वासनासह आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. मात्र तरीही आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका मांडणार, हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, एबीपी माझावर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण होणार आहे.
आणखी वाचा























