एक्स्प्लोर
तरच मुंबई महापालिकेत युती शक्य, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

नागपूर : मुंबई महापालिकेतील गैरकारभाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे मुंबईच्या विकासाचं भाजपचं व्हिजन मान्य असेल, तरच शिवसेनेशी युती होईल, असं वक्तव्य नागपुरात पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. भाजपची वाढलेली ताकद आणि भाजपचं मुंबईच्या विकासासाठीचं विजन हे जर शिवसेनेला मान्य असेल, तरच युती शक्य होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. महापालिकेच्या कारभारासंदर्भात भाजपची भूमिका जर त्यांना मान्य असेल तरच युतीचा विचार करण्याचं फडणवीस म्हणाले. मुंबई महापालिकेतील कारभाराबद्दल देवेंद्र फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एमएमआरडीएचं बजेट कमी असून कामं जास्त आहेत, मात्र महापालिकेचं बजेट एवढं अवाढव्य असूनही काहीच कामं होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता असली पाहिजे, असंही त्यांनी बोलून दाखवलं. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, मात्र शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवल्याचंही चित्र आहे. त्यामुळे युती होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























