एक्स्प्लोर
मराठा आरक्षणाला फाटे का फोडता?, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला सवाल
नागपूर : मराठा आरक्षण आणि मुस्लीम आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज भाजपने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर काँग्रेसने मराठा आरक्षणासोबत मुस्लीम आरक्षणाचा प्रस्तावही मांडण्यास सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला धारेवर धरलं.
काय झालं विधानसभेत?
भाजपकडून विधानसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर काँग्रेसच्या मुस्लीम आमदारांनी भाजपच्या मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला. मराठा आरक्षणाच्या प्रस्तावासोबत मुस्लीम आरक्षणाचा प्रस्तावही मांडा, असं काँग्रेसच्या मुस्लीम आमदारांचे म्हणणे होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेत, सर्वांनाच धारेवर धरलं. मुख्यमंत्री म्हणाले, "मराठा आरक्षणाचा प्रस्ताव हा भाजपने मांडलेला प्रस्ताव आहे. तुम्हीही प्रस्ताव मांडा. कामकाजाची वेळ अजून संपलेली नाही. तुम्ही अजूनही प्रस्ताव देऊ शकता.", असे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या आमदारांना सुनावलं.
"तुम्हाला मराठा आरक्षणावर चर्चा नको आहे का? मराठा आरक्षणाला फाटे फोडायचे आहेत का? तुम्ही राजकारण करत आहात.", असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. शिवाय, तुम्ही चर्चेची नोटीस द्या, मी चर्चेला उत्तर देईन, असेही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला यावेळी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement