(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मलिक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा ? ; वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी सात ठिकाणी छापा
ED raids : पुण्यातील कथित जमिन घोटाळा प्रकरणी ईडीने पुण्यातील सात ठिकाणी छापेमारी केली. नवाब मलिक यांच्याकडे राज्याच्या अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी आहे.
पुणे: एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करता करता भाजप नेत्यांविरोधात आरोपांचे बॉम्ब फोडणारे नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. कथित जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने आज पुण्यातील वक्फ बोर्डाच्या सात ठिकाणांवर छापा मारला.
Maharashtra | Enforcement Directorate is conducting raids at seven locations in Pune, in connection Waqf Board land scam case
— ANI (@ANI) November 11, 2021
पुणे पोलिसांनी या प्रकरणात ऑगस्ट महिन्यात दोघांना अटक केली होती. या अधिकाऱ्यांवर पदावर असताना 7.76 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या अखत्यारीत घेतला आहे.
ड्रग्ज प्रकरणी मलिक आक्रमक!
गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा साठा पकडल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. मलिक यांनी म्हटलं की, मुंबई शहर ड्रग्जचं हब झालं आहे असा दावा वारंवार केला जातो. आता एक घटनाक्रम समोर आला आहे की गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटी रुपये किमतीचं ड्रग्ज सापडले आहेत. समुद्रामार्गे गुजरातमध्ये येत सर्व देशभरात ड्रग्ज जातंय का? याची चौकशी करावी, अशीही मागणी मलिक यांनी केली. मनीष भानुशाली, धवल भानुशाली सुनील पाटील हे गुजरातच्या नोव्हेंटॅल हॉटेल मध्ये राहत होते. त्यांचे किरीटसिंह राणा यांच्याशी संबंध आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा ड्रग्ज सापडल्यामुळे पुन्हा आता यांच्याबाबत संशय निर्माण झाला आहे, असं मलिक म्हणाले.