औरंगाबाद, नागपूर आणि कल्याणमध्ये ब्रिटनहून परतलेले नागरिक कोरोनाबाधित
ब्रिटनहून आलेली डोंबिवली येथील महिला कोरोनाबाधित आढळली आहे. या कोरोनाबाधित महिलेमुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
मुंबई : राज्य शासनाने ब्रिटनहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 69 जणांची यादी कल्याण डोंबिवली महापालिकेला पाठवली आहे . या मधील 20 जणांचे स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. या 20 जणांपैकी एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला डोंबिवली पूर्व येथील आहे. तर उर्वरित प्राप्त अहवाल हे निगेटिव्ह आले असून काही जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने सदर नागरिकाची प्रकृती स्थिर असून त्यांस इतर कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. सदर नागरिकास विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून या नागरिकाचा चाचणी अहवाल जनुकिय रचनेच्या तपासणीसाठी NIV मुंबई येथून NIV पुणे येथे पाठविण्यात आल्याचे सांगितले.
ब्रिटनमधून 13 डिसेंबरला नागपुरात परत आलेल्या आणखी 3 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यामध्ये आई आणि मुलगी या दोघीही कोरोनाबाधित आहेत. दरम्यानच्या काळात दोघीही अकोल्याला जाऊन आल्याची माहिती पुढे आलीय. तसेच नागपुरातील आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलाय. या सर्वांचे सॅम्पल आज जिनोम टेस्टिंगसाठी पुण्यात एआयव्हीकडे पाठवण्यात आलेत. आता त्यांचा काय रिपोर्ट येतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
औरंगाबादमध्ये ब्रिटनमधून आलेली महिला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तिच्यावर धुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. औरंगाबादमधील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा स्वॅब तपासणीसाठी पुण्यात एनआयव्हीकडे पाठवला आहे. तिच्यामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे की जुना हे एनआयव्ही अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विमान वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता केंद्र सरकारनेही भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.
Coronavirus | पुढची दहा वर्षे कोरेना आपल्यासेबत राहू शकतो : बायोएनटेकचे सीईओ उगर साहीन