एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, चाकरमान्यांचा प्रवास जलद होणार
सिंधुदुर्गात विमानतळ सुरु झाल्यानं तळकोकणात जाणाऱ्या प्रवासी आणि चाकरमान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. सिंधुदुर्गात विमानतळ सुरु झाल्यानं तळकोकणात जाणाऱ्या प्रवासी आणि चाकरमान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे.
सिंधुदुर्गमध्ये कुडाळजवळील या विमानतळासाठी 520 कोटींचा खर्च करण्यात आला. गेल्या वर्षी गणेशोत्सवावेळी चिपी विमानतळावरुन विमान उड्डाणाची चाचणी घेण्यात आली होती.
चिपी विमानतळाच्या आज झालेल्या उद्घाटनाला खासदार नारायण राणेही उपस्थित होते. प्रत्यक्ष विमान कधी उडणार, अजून कसली कसली उद्घाटने करणार असा सवाल राणेंनी कालच सोमवारी उपस्थित केला होता. त्यांना आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे.
यावर आम्ही नुसती उद्घाटने करत नाही तर कामही करतो', असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. दरम्यान या जुगलबंदीत मुख्य़मंत्र्यांनीही राणेंना टोमणा मारुन घेतला. नारायणराव राणे यांचं स्वप्न दीपक केसरकर यांनी पूर्ण केले हे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे यश असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement