एक्स्प्लोर
अकोल्यात बँक कर्मचाऱ्यांकडून तीन अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण, आरोपी जेरबंद
आरोपी तेरा ते चौदा वयोगटातील मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवत लैंगिक शोषण करायचा. हा प्रकार एका मुलांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. याप्रकरणी मुलांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी गावंडेविरोधात रात्री गुन्हा दाखल केला आहे.
अकोला : अकोल्यात एका बँक कर्मचाऱ्यांनं तीन अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. जयप्रकाश गावंडे असं या आरोपी बँक कर्मचाऱ्यांचं नाव आहे. तो शहरातील गुडधीचा रहिवाशी आहे. गावंडे हा शहरातील एका अर्बन बँकेत लिपीक म्हणून कार्यरत आहे. आरोपी तेरा ते चौदा वयोगटातील मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवत लैंगिक शोषण करायचा. हा प्रकार एका मुलांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. याप्रकरणी मुलांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलीसांनी गावंडेविरोधात रात्री गुन्हा दाखल केला आहे. त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात पीडित मुलांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आरोपी गावंडे गेल्या वर्षभरापासून आपल्या घराजवळील तेरा ते चौदा वयोगटातील मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवत घरी बोलावायचा. यानंतर तो या मुलांना गोष्टींमध्ये भूलवत त्यांचं लैंगिक शोषण करायचा. आरोपी गावंडे हा घरात एकटाच राहत असल्याने हा प्रकार गेल्या वर्षभरापासून बिनबोभाटपणे सुरू होता. एक दिवस गावंडे हा मुलांसोबत अश्लील वर्तवणूक करीत असताना एका लहान मुलाच्या आजोबांच्या लक्षात हा प्रकार आला. याचा जाब गावंडे याला काही मुलांच्या पालकांनी विचारल्यानंतर तो पालकांशी हुज्जत घालू लागला. शेवटी मुलांना विश्वासात घेत पालकांनी याची तक्रार सिव्हील लाईन पोलिसांत केली. या तक्रारीवरून गुरूवारी रात्री आरोपी जयप्रकाश गावंडे याच्यावर पॉस्कोसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोल्यातील या घटनेमुळे पालकांची चिंता वाढली आहे.
धामणगाव रेल्वे अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरण, मुलीला त्रास देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अखेर बेड्या
पीडित मुलांची संख्या वाढण्याची शक्यता :
या प्रकरणातील पीडित मुलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या पीडित मुलांची संख्या तीन आहे. ही सर्व मुले सातवी-आठवीतील असून तेरा-चौदा वयोगटातील आहेत. याप्रकरणी आणखी पीडित मुलं आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
आरोपीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी :
दरम्यान, आज सिव्हील लाईन पोलीसांनी आज आरोपी जयप्रकाश गावंडे याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पोलिसांच्या मागणीवरून आरोपी जयप्रकाश गावंडेला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
नाशिक
बातम्या
क्राईम
Advertisement