एक्स्प्लोर

धामणगाव रेल्वे अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरण, मुलीला त्रास देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अखेर बेड्या

हत्येपूर्वी या प्रकरणात आई-वडिलांनी दोन वेळा सागर तितुरमारे मुलीला त्रास देत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याच्याविरुद्ध हत्येपूर्वी दत्तापूर पोलिसांकडून कठोर कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केला होता.

अमरावती : धामणगाव रेल्वे शहरात तरुणीच्या हत्याप्रकरणात मृत मुलीला त्रास देणाऱ्या ठाणेदाराला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. दत्तापूरचा ठाणेदार राजेंद्र सोनोनेला अखेर अटक केलं आहे. धामणगाव रेल्वेमध्ये सहा जानेवारीला अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी थेट ठाणेदाराविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केला होता. या प्रकरणी आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी केली असता यामध्ये ठाणेदार दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणेदार राजेंद्र सोनवणे मृतक मुलीच्या घरी जाऊन वारंवार मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करायचा असं चौकशीत निष्पन्न झाल्याने ठाणेदार राजेंद्र सोनवणे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आली आहे. धामणगाव रेल्वे शहरात सहा जानेवारीला सागर तितुरमारे या माथेफिरूने चाकूचे अनेक वार करून तरुणीची हत्या केली होती. त्यानंतर आरोपी सागर तितुरमारे याने स्वतःलाही चाकूने भोसकून घेतलं होतं. या प्रकरणात ज्या ठाणेदाराकडे आई-वडील आणि मुलगी माथेफिरूची तक्रार घेऊन गेले होते. त्या ठाणेदारांनी तिला सुरक्षा देण्याऐवजी वारंवार फोन करून, अश्लील बोलून, इतकचं नाही तर वारंवार कॉलेजमध्येही भेटायला जात त्रास दिला होता.

धामणगाव रेल्वेतील तरुणीच्या हत्याप्रकरणाला वेगळं वळण; आईवडिलांच्या आरोपांमुळे खळबळ

मुलीच्या आईवडिलांनी ठाणेदाराविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. हत्येपूर्वी या प्रकरणात आई-वडिलांनी दोन वेळा सागर तितुरमारे मुलीला त्रास देत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याच्याविरुद्ध हत्येपूर्वी दत्तापूर पोलिसांकडून कठोर कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केला होता.
जुलै 2019 मध्य मुलीला फूस लावून सागर तितुरमारे याने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी दत्तापूर पोलिसात केली होती. त्यावेळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र सोनोने यांनी मुलीचा शोध लावून चार दिवसांनी परत आणले होते. त्यानंतर आम्ही दोघे आणि मुलीला नंतरची तक्रार देण्यासाठी ठाण्यात बोलावले होते. पण आमची तक्रार घेऊन माझ्या मुलीचे मेडीकल करा आणि त्या सागर याच्यावर गुन्हा दाखल करा, असे आम्ही दोघांनीही विनंती केली. मात्र, ठाणेदारांनी आम्हाला तसे करू नका तुमच्या मुलीची बदनामी होईल असे सांगितले. तरी पण आम्ही ठाणेदाराला विनंती केली तर त्यांनी माझ्या मुलीला त्यांच्या ऑफिसमध्ये एकटीला घेऊन अडीच तास चर्चा केली आणि आम्ही आई-वडील दोघेही रात्री साडेदहापर्यंत बाहेर थांबून होतो. तरीही त्यांनी गुन्हा दाखल केलाच नाही. उलट आम्हाला सांगितले, की तुम्ही चिंता करू नका, काही होणार नाही, घरी जा मी सांभाळून घेतो, असं ठाणेदारानं म्हटलं होतं, अशी आपबीती मुलीच्या आईवडिलांनी सांगितली होती. ठाणेदाराकडून मुलीला वारंवार त्रास मुलीच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की, यानंतर आम्ही काही दिवसांनी आमच्या मुलीला कॉलेजमध्ये पाठवणे सुरू केले. तेव्हा ठाणेदार हे स्वतः आमच्या घरी येऊन तुमची मुलगी सुंदर आहे, मी तिला पोलिसात लावून देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांचे घरी या ना त्या कारणावरून जबरदस्ती येणे सुरू झाले. इतकच नाही तर ठाणेदार हे मुलीला भेटण्यासाठी कॉलेजमध्ये जात होते. वारंवार तिला फोन करत होते. शेवटी मुलीने ही बाब तिच्या आईला सांगितले, की आई ठाणेदार खूप वाईट बोलतो फोनवर त्यांना सांग की फोन नका करत जाऊ, तरी ठाणेदार यांनी थातूर-मातूर उत्तर देऊन फोन लावणे सुरूच ठेवले. सहा जानेवारीला सागर तितुरमारे याने मुलीची निर्घृण हत्या केली, असे गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6:30 AM :20 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:00 AM : 20 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रमZero Hour Vidhan Sabha Election | मतदानाआधीच राजकीय महाभारत, निवडणूक आयोगाकडून किती कोटी जप्त?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget