एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात येऊ घातलेल्या नव्या प्रकल्पात कामगार निर्मितीसाठी कौशल्य विकास केंद्रही उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. औरंगाबादेतल्या महाएक्स्पो प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी औद्योगिकीकरणात यांत्रिकीकरण होत असतानाच स्थानिक भूमिपुकत्रांच्या रोजगाराचा मुद्दाही उपस्थित केला
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील बळीराजाला कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे. शिवाय, राज्यात येऊ घातलेल्या नव्या प्रकल्पात कामगार निर्मितीसाठी कौशल्य विकास केंद्रही उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. औरंगाबादेतल्या महाएक्स्पो प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी औद्योगिकीकरणात यांत्रिकीकरण होत असतानाच स्थानिक भूमिपुकत्रांच्या रोजगाराचा मुद्दाही उपस्थित केला आणि उद्योगपतींना भूमिपुत्रांना संधी देण्याचं आश्वासन दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर असून ते दोन दिवस औरंगबाद सह, लातूर ,उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत. औरंगाबाद मधील औद्योगिक प्रदर्शनीचे उदघाटन करून ते दौऱ्याला सुरुवात केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, उद्योजकांसमोर अनेक अडचणी आहेत. अडचणींचा सामना करून उद्योजकांनी मोठं विश्व उभं केलं आहे. जर त्यांच्यासमोरील अडचणी दूर केल्या तर उद्योजक आणखी मोठं विश्व उभारू शकतील. उद्योजकांच्या काही सुचना असतील तर त्या त्यांनी सरकारलाल पाठवाव्यात. राज्यात विकासाचा दिवा पेटला पाहिजे. देशाला महाशक्ती बनवताना शक्ती देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करेल.
Uddhav Thackeray | गॅस पेटवणं सोपं, पण चूलही पेटली पाहिजे : उद्धव ठाकरे | ABP Majha
गॅस पेटवणं एका राजकारण्यासाठी सोपं आहे परंतु चूलही पेटली पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता गॅस जोडणी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन मोदींना टोला लगावला आहे. शेतकरी हा एक पाऊल पुढे टाकून मेहनत करत असतो. आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कर्जमुक्तीसोबतच शेतकऱ्यांना चिंतामुक्तही करणार आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले आम्ही संकटावर मात करून हे सरकार उभं केलं आहे. उद्योजकांना प्रेरणा देणारं हे सरकार असेल. देशात आर्थिक मंदी आहे म्हणून रडत बसलो तर आपण लढू शकणार नाही आणि रडणारे तसं नीट जगूही शकणार नाही. लढतो तो जगतो. महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दोन दिवसांच्या या आढावा बैठकीत अवकाळी पावसाने झालेले नुकसान, त्यावरील उपाय,जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्ते, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, तसेच अपूर्ण जलसिंचन आणि ग्रामीण पेयजल योजनांचा देखील ते आढावा घेणार आहे. तसेच शुक्रवारी (10 जानेवारी) उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेची देखील पाहणी करणार आहेत.
संबंधित बातम्या :
संघ विचाराच्या कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द करा, काँग्रेसच्या आशिष देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे
'छपाक'मध्ये अॅसिड फेकणाऱ्याचा धर्म बदलला? काय आहे सत्य?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement