एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक भावनिक पत्र लिहलं आहे.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक भावनिक पत्र लिहलं आहे. कर्जबाजारीपणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers suicides) वाढल्या आहेत. त्यातच एका शेतकऱ्याने विधानभवनासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भावनिक पत्रातून साद घातलीय. तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आत्महत्या करु नका असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलंय तसंच सरकार कायम बळीराजासोबत असल्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी या पत्रातून दिली आहे.

तोलामोलाचा जीव वाऱ्यावर सोडून जाऊ नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे. काल एका शेतकऱ्याने विधानभवनाबाहेर थेट  स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. दरम्यान यासंदर्भात शेतकऱ्यांनो तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका अशी भावनिक साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकरी बांधवांना पत्राद्वारे घातली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय

मराठी मातीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा

महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतू, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं,  तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं. वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. 

रडायचं नाही, लढायचं...

लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की 'रडायचं नाही, लढायचं....

शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करू नका

'शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका..आत्महत्या करू नका... मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं. 

सरकार 24 तास तुमच्यासाठी
 
मी आणि माझं सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्यासोबत आहे, याची खात्री बाळगा. जीव देणं बंद करुयात. जीव लावूयात एकमेकांना. चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया!

असे भावनिक साद घालणारे पत्र एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना लिहलं आहे. या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच सरकार तुमच्या पाठिशी उभं असल्याचा विश्वास दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Embed widget