छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकर
Chhatrapati Shivaji Maharaj : शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण दिले, ते मराठ्यांचे होते. मराठ्यांना पहिलं आरक्षण नव्हते. त्यानंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं?
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराज ओबीसी होते, असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणीमध्ये केलं आहे. गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी बोलताना जानकर म्हणाले की, "शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण दिले, ते मराठ्यांचे होते. मराठ्यांना पहिलं आरक्षण नव्हते. त्यानंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं? छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होता. त्यावेळी मराठ्यांना वाटले आम्ही सर्वत्र मिरवतो, आम्हाला नको ते आरक्षण अन् आज काय अवस्था झाली बघा."
परभणीमधील गंगाखेड तहसीलसमोर ओबीसी संघटनांकडून सोमवारी ओबीसी आरक्षणासाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनाला महादेव जाणकर यांनी भेट दिली. यावेळी जानकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्यात त्यांनी थेट शाहू महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केलं. तसेच शिवाजी महाराज ओबीसी होते असेही ते म्हणाले.
नेमकं महादेव जाणकर काय म्हणालेत?
सामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतो, माझे 30-35 आमदार होऊ द्या. ओबीसींची 10 मिनिटांत गंमत करून दाखवतो. मराठ्यांना, मुसलमानांना ही आरक्षण देतो. मुसलमानांवर तर किती अन्याय आहे, गॅरेज बघितलं कि मुसलमान, अंड्याचे दुकान म्हणलं की मुसलमान, कोंबडीचे दुकान बघितले की मुसलमान, त्यांचा कुठं कलेक्टर नाही. नुसती बोंबाबोंब, कुठे केळी विकतायत, कुठे फळ विकतायत अन् त्या मुलसमांनाना लोक शिव्या देतात. हिंदू भी भिकारी अन मुसलमान भी भिकारी. अन् राज्य चालवणारा हा तिसराच मालक असतो. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. मराठा समाजाला मी विनंती करतो, शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण दिले, ते मराठ्यांचे होते. मराठ्यांना पहिलं आरक्षण नव्हते. त्यानंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं? छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होता. त्यावेळी मराठ्यांना वाटले आम्ही सर्वत्र मिरवतो, आम्हाला नको ते आरक्षण अन् आज काय अवस्था झाली बघा.
आम्ही काय भाजपचे चेले नाही
ओबीसी आरक्षणासाठी परभणीच्या गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी तहसील कार्यालयासमोर अखंड धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात जानकर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबरच भाजपवर चांगलीच टीका केलीय. जेव्हा कलम 340 आणि 341 लिहिलं गेलं तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी ओबीसी आरक्षणाला तमाम भारतीय जनता पक्षाचा विरोध होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला. ओबीसीबाबत बोललं की संपवलं जात असा आरोप यावेळी जानकरांनी केला. ओबीसी आरक्षण जाण्याला कॉंग्रेस आणि भाजप दोघेही जबाबदार आहेत. कॉंग्रेसच काय भाजपही आपल्याला ओबीसी आरक्षण देऊ शकत नाही, हे शर्यत लावून सांगतो. कारण, हे दोन्ही पक्ष एकच आहेत. या दोन्ही पक्षांनी ओबीसींचा डेटा द्यायचा नाही असं एकत्रीत ठरवले असल्याचा गंभीर आरोप जानकरांनी केलाय. आम्ही काय भाजपचे चेले किंवा काँग्रेसचे दलाल नाही. त्यामुळे ओबीसींच्या बाबतीत जेव्हाही आवाज उठवायचा असेल तेव्हा आम्ही उठवू असंही जानकर यावेळी म्हणाले.
घोड पेंड कुठे खाते
सभागृहात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते ओबीसींची जणगणना झाली पाहिजे, मग घोड पेंड कुठे खाते? असा सवाल जानकर यांनी केला. भाजप आणि काँग्रेसने ओबीसींची आकडेवारी द्यायची नाही ठरवले आहे. कारण आकडेवारी दिली तर समाजाची प्रगती होईल, त्यामुळे ते आकडेवारी देत नसल्याचे जाणकर म्हणाले. ज्यावेळेस ओबीसींची पोर सभागृहात जातील त्यावेळीच समाजाला न्याय मिळेल. मी कोणत्या पक्षावर टीका करण्यासाठी आलो नाही, मात्र, ज्या पक्षाने केले ते सांगण्यासाठी गंगाखेडमध्ये आलो असल्याचे जानकरांनी सांगितले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
भाजप आणि काँग्रेस एकच; दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत, जानकरांचा निशाणा