Chh. Sambhaji Nagar Sabha Live Updates : काश्मीरची एक न एक इंच जमीन घ्या, मग आम्ही मानू; उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान
Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार असून त्यासाठी महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

Background
Chhatrapati Sambhaji Nagar Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनरगमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
आजच्या या सभेला परवानगी देताना पोलिस प्रशासनाने काही अटी घालून दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये कार्यक्रमाच्या वेळेत आणि ठिकाणात कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी, सभेला येताना आणि परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. सभास्थानी कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये, यासह अन्य अटीवर सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, संभाजीनगरमध्ये सध्या तणावग्रस्त वातावरणान आहे. त्यामुळं या सभेवेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फैजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील तणावग्रस्त वातावरणानंतर राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं राजकीय वातावरण देखील तापलं होतं. दरम्यान, आजच्या या महाविकास आघाडीच्या सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून, राजकीय नेते आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागा, मग समजेल महाराष्ट्राची जनता कुणाच्या मागे आहे; उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान
माझा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, वडीलही चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या वडिलांना काय वाटत असेल अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मोदींच्या नावे मतं मागा, मी माझ्या बापाच्या नावाने मतं मागतो, मग समजेल महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे असं आव्हानही त्यांनी दिलं.
Sambhaji Nagar Sabha: काश्मीरची एक न एक इंच जमीन घ्या, मग आम्ही मानू; उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान
अमित शाह म्हणाले की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, पण जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंच जमीन घेऊन दाखवा, तर आम्ही मानू. वल्लभभाईंचा पुतळा उभा केला, देशभरातून पोलाद गोळा केले, पण त्या पोलादाचा एक कण तरी धमन्यामध्ये आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.























