एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : अल्पवयीन अविवाहित मुलीने दिला बाळाला जन्म; प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar : पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, पीडिता मध्य प्रदेशातील आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात बाळाला जन्म देणारी मुलगी अल्पवयीन अविवाहित असल्याचे कळताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घाटीत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहर पोलिसांकडून हा गुन्हा मध्य प्रदेशातील निवाली (ता. शेंदवा, जि. बडवाणी) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. लोकेश आसाराम सोळुंके (वय 23 वर्षे) असे प्रियकराचे नाव आहे. 

अधिक माहितीनुसार, पीडिता मध्य प्रदेशातील आहे. दहावीत असताना तिची लोकेश सोळंके सोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात पीडितेच्या मैत्रिणीच्या किरायाच्या खोलीत दोघांच्या भेटी होऊ लागल्या. याच काळात दोघांमध्ये शरीरसंबंध आल्याने पीडिता गर्भवती राहिली. ही माहिती तिने लोकेशला दिली असता, आपण पोलिस भरतीचा पेपर देणार आहे. त्यानंतर लग्न करतो, असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर तो पीडितेकडे फिरकलाच नाही. 

दरम्यान, पीडिताने लोकेशची तीन महिने त्याची वाट पाहिली. मात्र, तो काही परत आला नाही. या काळात तिचा गर्भ आठ महिन्यांचा झाल्यावर अखेर आई-वडिलांनी तिला बाळंतपणासाठी बहिणीकडे छत्रपती संभाजीनगरात पाठविले. तर, तिच्या बहिणीने 19 सप्टेंबरला तिला घाटीत दाखल केले. तेथे तिचे नाव आणि वय नोंदविल्यानंतर ती 18 वर्षे 1 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले. 18 व्या वर्षीच बाळंतीण होत असल्यामुळे अल्पवयीन असताना ती गर्भवती राहिली, हे स्पष्ट होताच डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी जबाब घेऊन आकाश सोळंकेविरुद्ध गुन्हा नोंदविला.  मात्र, अत्याचाराची घटना मध्य प्रदेशात घडली असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील तपास मध्यप्रदेश पोलीस करणार आहे. 

प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल 

आरोपी आकाश आणि पिडीत तरुणीमध्ये आधी मैत्री आणि त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, या काळात दोघेही लपूनछपून भेटू लागले. याच काळात दोघांमध्ये शरीरसंबंध आले. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. याबाबत तिने आकाशला सांगितले. पण आपण लवकरच नोकरीला लागणार असून, पोलीस भरतीचे पेपर देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. तेथून आल्यावर आपण लग्न करू असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पिडीत मुलीच्या लक्षात आले. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhaji Nagar : रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या महिलेसोबत घडलं भयंकर; गावालगतच्या विहिरीत आढळला मृतदेह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget