एक्स्प्लोर
Advertisement
अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची तपासणी, अशोक चव्हाणांची माहिती
अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची देखील तपासणी केली जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य शिवस्मारक अरबी समुद्रात उभारलं जाणार आहे. मात्र स्मारक अरबी समुद्रात असल्याने लोक शिवस्मारकापर्यंत पोहोचणार कसे याबाबत विचार राज्य सरकार करता आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची देखील तपासणी केली जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
शिवस्मारक पोहोचायला काय पर्याय आहेत हे तपासावे लागेल. तिथे 12 महिने बोटीने जाणे शक्य होणार नाही. पावसाळ्यात समुद्र उफळलेला असतो, त्यावेळी तिथे बोट जाऊ शकत नाही. 12 महिने वाहतूक करायची असेल तर काय पर्यायी व्यवस्था करायची याचा विचार सुरू आहे. भुयारी रेल्वे होऊ शकेल का याची तपासणी देखील सुरु आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
कसं असेल शिवस्मारक? शिवस्मारकाची जागा राजभवनापासून 1.2 किमी, गिरगाव चौपाटीपासून 3.6 किमी आणि नरिमन पॉइंटपासून 2.6 किमी अंतरावर आहे. 6.8 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा असणार आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे. तीन निविदांपैकी सर्वात कमी असलेली 'एल अँड टी' कंपनीची 3 हजार 826 कोटी रुपयांची निविदा पात्र ठरली. हा प्रकल्प 2 हजार 500 कोटी रुपयांचा असून त्यामध्ये जीएसटी धरण्यात आलेला नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत. शिवस्मारकात काय काय? या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचं जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
बॉलीवूड
Advertisement