(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayan-3 : इस्त्रोच्या मोहिमेत महाराष्ट्राचा मोठा वाटा; चांद्रयान-3 चं पुणे कनेक्शन आहे माहिती आहे का?
भारताचे नुकतेच चांद्रयान 3 आकाशात झेपावलं आहे. या इस्त्रोच्या मोहिमेत महाराष्ट्राचा देखील मोठा वाटा आहे. चांद्रयान-3 ला लागणारे बूस्टर्स हे महाराष्ट्रात बनवले गेले आहेत.
Chandrayan-3 : भारताचे नुकतेच चांद्रयान 3 आकाशात झेपावलं (Chandrayaan-3) आहे. या इस्त्रोच्या मोहिमेत महाराष्ट्राचा देखील मोठा वाटा आहे. चांद्रयान-3 ला लागणारे बूस्टर्स हे महाराष्ट्रात बनवले गेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील वालचंद इंडस्ट्रीजमध्ये चांद्रयानला लागणारे हे बूस्टर बनवण्यात आले होते. बूस्टर सोबत चांद्रयान 3 चे फ्लेक्स नोजल देखील याच वालचंद इंडस्ट्रीज बनवण्यात आले होते.
वालचंद इंडस्ट्री आणि इस्रो गेली 50 वर्ष सोबत काम करीत आहेत. भारताने आजपर्यंत विविध उपकरणे ही अवकाशात पाठवली आहेत. त्यातील हार्डवेअर बनवण्यात वालचंद इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत वालचंद इंडस्ट्रीने SLV 3, ASL ते PSLV, GSLV MKII, MKIII या प्रतिष्ठित मोहिमांसह मंगळयान, चांद्रयान-सारख्या प्रतिष्ठित मोहिमांसह इस्रोच्या सर्व कार्यक्रमांसाठी हार्डवेअरच्या श्रेणीचे उत्पादन वालचंद इंडस्ट्रीत बनविण्यात आले आहेत.
तसेच चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि आता चांद्रयान -3 मिशनच्या LVM3 प्रक्षेपण वाहनामध्ये वापरलेले बूस्टर सेगमेंट S200 हेड, एंड सेगमेंट, मिडल सेगमेंट आणि 3.2 मीटर व्यासाचे नोजल एंड सेगमेंट तयार केले गेले. चांद्रयान तीन मध्ये एकूण सहा बूस्टर वापरण्यात आले होते. त्यातील चार बूस्टर हे वालचंद इंडस्ट्रीज बनवले गेले आहेत. बूस्टर म्हणजे मोठ मोठ्या यानाला अंतराळात झेपवण्याठी जमिनीपासून आग ओकणारी ऊर्जा देणाऱ्या यंत्र म्हणजे बूस्टर. WIL ने LVM3-M4s उपप्रणाली जसे Flex nozzle control tankages आणि S200 Flex nozzle hardware मध्ये देखील वालचंद इंडस्ट्रीचे योगदान आहे.
बूस्टर बनवण्यासाठी वालचंद इंडस्ट्रीला दोन वर्षे
चांद्रयानासाठी लागणारे बूस्टर बनवण्यासाठी वालचंद इंडस्ट्रीला दोन वर्षे लागली. या दोन वर्षात बूस्टरसाठी साधारणत 225 कामगार काम करत होते. 2022 साली बूस्टर आणि नोझल वालचंद इंडस्ट्रीजने इस्त्रोकडे सुपूर्द केले होते. विशेष म्हणजे वालचंद इंडस्ट्रीने काम करणारे लोक हे ग्रामीण भागातील आहेत. वालचंद इंडस्ट्री ही नेहमीच इस्त्रोच्या मोहिमेत वेगवेगळ्या उपकरण पुरवून महाराष्ट्राचे तसेच देशाचे मान उंचावत आहे.
मयुरेश शेटे हे इस्त्रोत शास्त्रज्ञ तर असिफभाई महालदार...
यांच्यासोबतच पुणे जिल्ह्यातील आणखी दोघांनी या मोहिमेत महत्वाची कामगिरी बजावली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दोन तरुण महत्त्वाची आणि अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. या मोहिमेत असिफभाई महालदार आणि मयुरेश शेटे यांचं योगदान आहे. असिफभाई महालदार हे रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीत आहे तर मयुरेश शेटे हे इस्त्रोत शास्त्रज्ञ आहे.
हे ही वाचा-