एक्स्प्लोर

Chandrashekhar bawankule: बाळासाहेब लढवय्ये होते, उद्धव ठाकरे रडोबा आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

संजय राऊत अंघोळीसाठी साबण काँग्रेसचा वापरतात पावडर राष्ट्रवादीची वापरतात आणि शिवसेनेला धुवून काढतात. संजय राऊतांना आमचे नितेश राणे धुवून काढतात, असे म्हणत राऊतांवर टीका केली.

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केलीय. बाळासाहेब हे लढवय्ये होते पण उद्धव ठाकरे आता रडोबा झालेत. तसंच नैतिकता उद्धव ठाकरेंना शोभत नाही अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे केवळ राडोबा झाले आहेत. लोकांना रडोबाचे राजकारण चालत नाही. रडोबाच्या राजकारणाने विकास होत नाही, ज्यांच्या रक्तामध्ये विकास, दूरदृष्टी आणि पक्ष नेतृत्व करण्याची क्षमता नाही. स्वतः शरद पवरांना वाटते की,  निर्णय चुकला. महाविकास आघाडीचा नेता अशा व्यक्तीला बनवलं ज्याला स्वत:चा पक्ष नीट सांभाळता आला नाही. त्यामुळे मला वाटते उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.   

 संजय राऊतांना आमचे नितेश राणे धुवून काढतात

संजय राऊत अंघोळीसाठी साबण काँग्रेसचा वापरतात पावडर राष्ट्रवादीची वापरतात आणि शिवसेनेला धुवून काढतात. संजय राऊतांना आमचे नितेश राणे धुवून काढतात, असे म्हणत राऊतांवर टीका केली. तसेच पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या भाष्यावर  देखील बावनकुळे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना जिथे जायचे तिथे जावे. त्यांना आता कामच राहिले नाही. दिवसभर आता फक्त पुस्तक चाळण्याचे काम त्यांच्याकडे आहे, असे देखील ते म्हणाले.

अजित पवार आमच्या संपर्कात नाहीत

दररोज पक्ष प्रवेश सुरु आहेत. मंगळवारी प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश आहेत. अजित पवार आम्हाला सहा महिन्यात भेटले नाहीत. ते आमच्या संपर्कात नाहीत आम्ही त्यांच्या संपर्कात नाहीत. त्यांनी स्वतः जाहीर केलं ते राष्ट्रवादीत राहणार आहेत. महाविकास आघाडीतील काही नेते अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करून डॅमेज करत आहेत, असे बावनकुळे म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसमुळे लांबणीवर पडल्या

स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे लांबणीवर पडल्या आहेत. मविआने चुकीच्या पद्धतीने जागा वाढवून घेतल्या तो निर्णय आम्ही रद्द केला. यामुळं ते कोर्टात गेले आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कोर्टातील केस मागे घ्यावी उद्या निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. 

सहा तास विकासाची सहा तास पक्षासाठी उपक्रम राबवणार

राज्याचे दहा मंत्री देवेंद्र फडणवीसांसह दर शुक्रवारी राज्यातील जिल्ह्याचा प्रवास करणार आहे. सहा तास विकासाची सहा तास पक्षासाठी हा उपक्रम राबवणार आहे. विकास आणि संघटनात्मक मुद्यावर हा दौरा केला जाणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget