एक्स्प्लोर
चंद्रपुरातील अल्पवयीन तरुणाच्या हत्येचा काही तासात छडा, दोन आरोपी अटकेत
शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर काल (29 एप्रिल) सकाळी 15 वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. डोक्यावर वार करुन त्याची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं.
चंद्रपूर : चंद्रपुरातील राजुरा इथल्या एका अल्पवयीन तरुणाच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून राकेश वाघमारे (वय 28 वर्ष) आणि माया सोनारकर (वय 25 वर्ष) अशी त्यांची नावं आहेत.
शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर काल (29 एप्रिल) सकाळी 15 वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. डोक्यावर वार करुन त्याची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि या दोन आरोपींना अटक केली.
मृत मुलाचे आणि अटकेत असलेल्या माया सोनारकरच्या एका नातेवाईक मुलीचे प्रेमसंबंध होते. हे संबंध तोडण्यावरुन आरोपी आणि मृत मुलाचे कडाक्याचं भांडण झालं होतं आणि यातूनच ही हत्या झाल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement