एक्स्प्लोर
रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी
रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारली आहे. चंद्रपूर आणि बल्लारशाह या दोन स्थानकांना पहिलं पारितोषिक विभागून देण्यात आलं आहे.
![रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी chandrapur and balharshah railway station got first rank in beautification competition latest update रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/03080034/Chandrapur-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारली आहे. चंद्रपूर आणि बल्लारशाह या दोन स्थानकांना पहिलं पारितोषिक विभागून देण्यात आलं आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दोन स्थानकांवर विदर्भातील प्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेच्या आधारे पेंटिग्ज, मूर्तींच्या कलाकृती तसंच भित्तीचित्रांचा वापर करत सौंदर्यीकरण केले आहे.
या स्पर्धेत बिहारमधील मधुबनी स्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर तामिळनाडूमधील मदुराई स्थानकानेही दुसरं स्थान पटकवलं आहे.
तर गुजरातमधील गांधीधाम, राजस्थानमधील कोटा आणि तेंलगणामधील सिंकदराबाद स्थानकांना तिसरा क्रमांक मिळाला आहे. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या स्थानकांना 10 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 5 लाख रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी 3 लाख रुपये पुरस्कारात देण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
बीड
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)