एक्स्प्लोर

Chandrakant Patil On Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनावर बोलण्यास चंद्रकांत पाटलांचा नकार, माध्यमांनापाहून थेट निघून गेले...

जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जनंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

पुणे : जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे  मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Reservation Protest) झालेल्या लाठीचार्जनंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. चंद्रकांत पाटील हे राज्य शासनाच्या मराठा आरक्षण समन्वयक समितीचे अध्यक्ष आहेत. आज ते पुण्यात असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी माध्यमांना उत्तर न देता निघून गेले. त्यांच्या या कृत्यामुळे संतापलेल्या आंदोलकांच्या संतापात अधिकच भर टाकू शकते.

चंद्रकांत पाटील हे राज्य शासनाच्या मराठा आरक्षण समन्वयक समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जनंतर त्यांनी याबाबत काहीतरी बोलणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. 

शरद पवारांकडून जोरदार टीका 

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे शरद पवार, उदयनराजे भोसले यांनी थेट जालन्यात जाऊन सर्व जखमी लोकांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती. सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठी हल्ला केला. मुंबईहून आदेश आल्यावर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला असल्याचा गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला आहे. 

बारामतीत निषेध

जालना येथे मराठा बांधवावर झालेल्या हल्ल्याचा आज बारामतीत निषेध करण्यात आला. बारामतीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने बारामतीतील प्रशासकीय इमारतीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. तसेच ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्यांना तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच बारामती बंदची हाक आंदोलकांनी दिली.

नेमकं घडलं काय?

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये  29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्णाण झाली होती. त्यामुळं उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने विरोध झाला. पोलीस आणि आंदोलक यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला. 

इतर महत्वाची बातमी-

Jalna Protest : मुंबईच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीमार; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget