रोहिणी खडसेंनी दोन ठिकाणी मतदान केलं, त्या फत्त ट्विटरवरच टिव टिव करतात, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
रोहिणी खडसे (Rohini Khadse) या फत्त ट्विटरवरच टिव टिव करतात असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी त्यांच्यावर टीका केली.
Chandrakant Patil on Rohini Khadse : रोहिणी खडसे (Rohini Khadse) या फत्त ट्विटरवरच टिव टिव करतात असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी त्यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी मुक्ताईनगर मतदारसंघात मतदान चोरी झाल्याचं ट्विट केलं होतं. यावर पाटील यांनी टीका केली. रोहिणी खडसे यांचं दोन ठिकाणी मतदान आहे. कोथळीतही मतदान आहे आणि मुक्ताईनगरमध्येही आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट रोहिणी खडसे यांच्या दोन ठिकाणच्या मतदानाची यादीच दाखवली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहिणी खडसेंनी टीव टीव का केली नाही?
रोहिणी खडसे यांनी दोन ठिकाणी मतदान केलं याचे पुरावे आम्हाला काढायला लावता का? महिला भगिनी आहे म्हणून आम्ही हे करत नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले. माझ्या मतदारसंघात 43 हजार मतदान हे दुबार तिबार आहे, तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. हायकोर्टात दाद मागितल्याचे पाटील म्हणाले. रोहिणी खडसे या पराभवाचे खापर फोडतायेत. मी बोगस मतदाना संदर्भात हायकोर्टात गेलो असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहिणी खडसेंनी का? टिव टिव केलं नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नेमकं काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे?
माजी आमदार अशोक पवार, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच सचिन दोडके यांनी एका प्रेझेंटेशनद्वारे महाराष्ट्रात कशाप्रकारे मतचोरी झाली यावर प्रकाश टाकला आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या एकाच घर क्रमांकवर 188 मतदार, बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार, आमदारांच्या बायकोचेच दोन मतदान ओळखपत्र, बाजूच्या मतदारसंघातून आयात केलेले मतदार, अशोक बापूंनी मांडलेले हे मुद्दे प्रचंड धक्कादायक होते. यातून माझ्याही मतदारसंघात असा प्रकार झाला असेल असे माझे मत झाल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या. आदरणीय शरद पवार साहेब यांनी या विरोधात मोठा लढा देण्याचे ठरवले आहे. या लढ्यात आदरणीय पवार साहेबांसमवेत आम्ही सगळेच खांद्याला खांदा लावून उभे राहू असे खडसे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी ट्वीट करत मतचोरीच्या मुद्याबाबत भाष्य केलं आहे. खडसेंनी ट्वीट करत संशय व्यक्त केलाय.
महत्वाच्या बातम्या:





















