(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Web Exclusive | आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेलिब्रिटी ड्रग्ज मागवतात, पोलिसांच्या खबरीची माहिती
बॉलिवूड आणि ड्रग्जच नात काही नवीन नाही आहे. सुशांत सिंग प्रकरणात रिया आणि शौविकचे चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याचा तपास सुरू केला.
मुंबई : बॉलिवूड आणि ड्रग्सच नातं तसं जुनंच आहे. मात्र सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्सचा अँगल समोर आल्यानंतर हे नातं पुन्हा उजेडात आलं आहे. बॉलीवूड मधील सेलिब्रिटीज त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ड्रग्ज मागवतात, याचा खुलासा एका पोलिसांच्या खबरीने केला आहे. बॉलीवूडमध्ये ड्रग्स कसे पोहोचतात? यांची लिंक कशी असते? कुठले ड्रग्स घेतले जातात? या सगळ्यांचा खुलासा या खबरीने केला आहे.
बॉलिवूड आणि ड्रग्जच नात काही नवीन नाही आहे. सुशांत सिंग प्रकरणात रिया आणि शौविकचे चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याचा तपास सुरू केला आणि त्यांच्या तपासामध्ये बॉलीवूड मधील बड्या कलाकारांची नावे ड्रग्स प्रकरणात समोर येऊ लागली, तशी ग्वाही सुद्धा रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिल्याची माहिती आहे.
बॉलीवूड मध्ये नेमके कुठल्या प्रकारचे ड्रग घेतले जातात?
MDMA हा ड्रग्स वेगवेळ्या रंगात येतात. जसे रंग येतात तशी यांची पावर असते. MDMA हे ड्रग्स शीतपेयांमधून घेतात, याची किंमत पाच हजार प्रति ग्राम आहे.
EXTACY PILLS : MDMA ला वितळून या गोळ्या बनवल्या जातात. या गोळ्या कोल्ड्रिंक्समध्ये घेतात ज्यात सोडा मिक्स असतो. या ड्रग्सला ट्रान्स संगीत महत्त्वाचे आहे. याची किंमत सात हजारापासून सुरू होत.जशी पावर तशी किंमत ठरते.
LSD PILLS : LSD हे पेपर आणि लोशन फॉर्म मध्ये येते. टाळूवर हा पेपर लावला जातो आणि हा इतका मादक असतो की, AC शिवाय हा ड्रग्स घेतला जाऊ शकत नाही. या ड्रग्सची नशा इतकी असते की, आपल्या हृदयाचे ठोके आपण स्पष्ट ऐकू शकतो.
कोकेन : कोकेनचा मुख्य स्त्रोत हा साऊथ आफ्रिका आहे. साउथ आफ्रिकेमधून कोकेन भारतात येतं. कोकेन ड्रग्जचा सगळ्यात जुना प्रकार आणि सगळ्यात जास्त प्रमाणात घेतलेला जाणारा ड्रग्ज आहे. याची किंमत 5000 प्रति ग्राम आहे. कोकेन 10 ते 12 हजार रुपये आहे. हा कोकेन कोलंबो मधून येतो म्हणून त्याला कोलंबो कोकेनही म्हणतात.
गांजा : हैद्राबाद गांजा हा सर्वात फेमस असून कॅलिफोर्निया येथे गांजा मोठ्या प्रमाणात विकला जातो. 500 रुपयांपासून याची सुरवात होती.
चरस : चरस हा मुख्य काश्मीर,मनाली म्हणजे थंड प्रदेशातून येतात. सिगरेटची तंबाखू काढून त्यामध्ये चरस भरुन ती सीग्रेट ओढली जाते. याची किंमत 3 हजार रुपये प्रति तोळा (10 ग्राम म्हणजे 1 तोळा) आहे. मोठ्या प्रमाणात कुरिअरने येतात आणि तिथून ते इतर ठिकाणी वाटले जातात. तरूणाई या ड्रग्ज सीनडेकट ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची माहिती आहे. चांगल्या आणि समृद्ध कुटुंबातील मूल ड्रग्स रॅकेटचा भाग होत आहेत. आयुष्यात काहीतरी अॅडव्हेंचर करायचा आहे म्हणून ही तरुणाई ड्रग्जकडे वळत आहे.
दर वेळेला तपास यंत्रणांकडून ड्रग्जच प्रकरण समोर आल्यानंतर हालचाली वाढतात. तपास यंत्रणा सज्ज होते मात्र कुठे मोठ्या ट्रक पकडणारपर्यंत येऊनच तो तपास थांबवला जातो आणि या सिंडिकेटचे जे मुख्य करता धरता असतात त्यांच्यापर्यंत तपास यंत्रणा कधीच पोहोचत नाही. त्यामुळे या ड्रग्जचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.