एक्स्प्लोर
धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयावर अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा
जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांचे निकटवर्तीय बळीराम कडपे यांच्यावर अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कडपे यांच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने छापे टाकले होते.
सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने जालना जिल्ह्यातील रायगव्हाण आणि आष्टी या दोन ठिकाणी तीन पथकांनी कारवाई केली होती. यात 19 खरेदी खत, 19 सातबारा, 10 इतर दस्तऐवज, दोन मुद्रांक शुल्क पेपर असे जवळपास 50 कागदपत्रे जप्त करण्यात आले होते.
बळीराम कडपे यांच्या पत्नी विमल कडपे या जालना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. 1997-98 या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून एक वर्ष काम पहिलं आहे. बळीराम कडपे हे धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अजय मुंडे यांचे मेहुणे आहेत.
रायगव्हाण येथील मुरलीधर गणपती केकान, महादेव परबत पोटे, प्रयागबाई हरिभाऊ पोटे यांनी बळीराम कडपे यांच्याविरुद्ध परतूर येथील सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती.
कडपे यांनी 161.90 आर जमीन बेकायदेशीर सावकारी करत आपल्या नात्यातील श्रीकृष्ण अश्रोबा कडपे, अनिरुद्ध उद्धवराव कडपे, उद्धव अश्रोबा कडपे, सुधामती अच्युतराव पोते, वाल्मिक बळीराम कडपे, विजय बळीराम कडपे या व्यक्तींच्या नावावर केली, असं या तक्रारीत म्हटलं होतं.
या तक्रारीनंतर औरंगाबाद येथील विभागीय सहायक निबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा उपनिबंधक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक संजीव देवरे यांच्या तीन पथकांनी 9 मार्च रोजी छापे मारले होते.
बळीराम कडपे यांचे औरंगाबादमध्ये दोन बंगले आहेत. तीस वर्षांपासून त्यांची सावकारी असल्याचीही माहिती आहे. या सावकाराकडे एक हजार एकर जमिन कागदपत्रासह आहे. व्याजाची रक्कम परत दिल्यानंतर सावकाराने 350 एकर जमिन परत दिली, असंही तक्रारदारांचं म्हणणं आहे.
डीडीआरच्या तक्रारीनंतर परतुर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनमध्ये बळीराम कडपेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 169 पानी अहवाल सादर करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement