एक्स्प्लोर
भाजप अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षांची गाडी जाळली
4 महिन्यापूर्वी ही टेका नाका परिसरात जमाल सिद्दकी यांच्या कारवर दगडफेक झाली होती. शिवाय काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने फोनवर जीवे मारण्याची धमकी ही दिली होती असा दावा जमाल सिद्दकी यांनी केला आहे.
नागपूर : मुस्लिम असून भाजपचा काम करतात म्हणून भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दकी यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची कार अज्ञात लोकांनी जाळल्याची घटना समोर आली आहे.
दत्तात्रय नगर परिसरात जमाल सिद्दकी यांच्या घरासमोर काल रात्री एक ते दीडच्या दरम्यान ही घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या घटनेप्रमाणे, घराच्या गेटसमोर उभी असलेली त्यांची पालियो कार अज्ञात लोकांनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. कार पेटवल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
मुस्लिम असून ही भाजप चा काम करतो म्हणून काही कट्टरपंथी मुस्लिमांना आवडत नाही. कालच्या घटनेतील हल्लेखोर काँग्रेसशी संबंधित कट्टरवादी असावेत असा संशय जमाल सिद्दकी यांनी व्यक्त केला आहे.
4 महिन्यापूर्वी ही टेका नाका परिसरात जमाल सिद्दकी यांच्या कारवर दगडफेक झाली होती. शिवाय काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने फोनवर जीवे मारण्याची धमकी ही दिली होती असा दावा जमाल सिद्दकी यांनी केला आहे. प्रत्येक वेळा पोलिसांकडे तक्रार केली मात्र नागपूर पोलीस तक्रारी बद्दल संवेदनशील नाही असा आरोप ही जमाल सिद्दकी यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement