(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिजाऊंच्या जन्मस्थळाजवळील अनेक जुनी झाडं कापली; शिवभक्तांच्या संतापानंतर पुरातत्त्व विभागाची माघार
सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचं (Rajmata Jijau) जन्मस्थान असलेल्या परिसरातील अनेक जुनी झाडं कापल्या प्रकरणी स्थानिकांचा विरोध बघता तुर्त पुढील वृक्षतोड ही पुरातत्त्व विभागाकडून थांबवण्यात आली आहे.
Buldhana News बुलढाणा : सिंदखेडराजा (Sindhkhed raja) येथील राजमाता जिजाऊंचं (Rajmata Jijau) जन्मस्थान असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाडा भोवतालची जवळपास 50 ते 60 वर्षे जुनी आणि सुमारे 60 ते 70 फूट उंच असलेली 40 ते 50 झाडे काल पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेश देऊन कापलीत. ही माहिती परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी आणि जिजाऊ भक्तांनी या ठिकाणी धाव घेतली. स्थानिक प्रशासनाला आणि जिजाऊ भक्तांना विश्वासात न घेता पुरातत्त्व विभागाने ही झाडे कापण्याचे आदेश दिले होते.
मात्र, स्थानिकांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत ही वृक्षतोड थांबवण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने आदेश देऊन पुढील वृक्षतोड थांबवली आहे. मात्र तोपर्यंत 40 ते 50 झाडे कापल्या गेली होती आणि यामुळे राजवाड्याला भकास असं स्वरूप आलेल आहे. यामुळे स्थानिक आणि जिजाऊ भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. स्थानिकांचा विरोध बघता तुर्त पुढील वृक्षतोड ही थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत नागपूर येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता सहाय्यक संचालक मयुरेश खडके यांनी सांगितलं की, "जिजाऊ जन्मस्थळा समोरील राजवाड्याला या मोठ्या झाडांमुळे सौंदर्याला बाधा आली होती. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या नियमाप्रमाणे कठीण निर्णय घ्यावा लागला. पुढील काळात पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे सौंदर्यकरणासाठी वृक्षारोपण करण्यात येईल." असे खडके यांनी सांगितलंय.
नेमकं प्रकरण काय?
झाडं तोडणं हा कायद्यानव्ये गुन्हा असून सर्वसामान्य नागरिकांना यासाठी मोठा दंडही आकारला जातो. वन विभागाचे वृक्षतोड किंवा वनसंपदा नुकसानीचे कायदेही कडक आहेत. त्यामुळे, वन विभागातील शासकीय संपदेचं नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाईही केली जाते. पण, चक्क शासकीय अधिकाऱ्यांकडूनच आता सिंदखेड राजा या जिजाऊ जन्मस्थळाजवळील जुनी झाडे कापण्यात आल्याचे समोर आले आहे. सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेला राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्याच्या परिसरातील जवळपास 40 एक झाडे आज पुरातत्व विभागाने कापून टाकली आहेत.
स्थानिक प्रशासनाला कुठलीही माहिती न देता ही झाडे कापून टाकल्यामुळे स्थानिक जिजाऊ भक्तामध्ये संतापाची लाट उसळली आहे. जवळपास 40 ते 50 वर्षांपासून सुशोभीकरणासाठी ही झाडे लावलेली होती, राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्याच्या नैसर्गिक सुंदरतेच्या सुशोभीकरणासाठी ही झाडे महत्त्वाची होती. मात्र, अचानक आज पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी या 60 फूट उंच झाडांची कत्तल केल्यामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या