Accident : मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; चाळीसगावच्या तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
Buldhana Mehkar Accident : मुंबई नागपूर महामार्गावर मेहकर शहरानजीक असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळ अल्टो कार व लक्झरी बसचा समोरासमोर धडक झाली.
Buldhana Mehkar Accident : बुलढाण्यातील मेहकरजवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात तिघांचा बळी गेलाय तर दोघे गंभीर जखमी झालेत. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई नागपूर महामार्गावर मेहकर शहरानजीक असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळ अल्टो कार व लक्झरी बसचा समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील तीन जण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात इंदल चव्हाण (38), योगेश विसपुते (32), विशाल विसपुते (38) यांचा मृत्यू झाला आहे. तर ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण, मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.
गंभीर जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अपघात इतका भीषण होता की धडक होताच कार ही लक्झरी बसमध्ये अडकली होती. त्यामुळे कारमधील जखमींना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्याने तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोन्ही गंभीर जखमींना औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कारमधील पाच जण हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील आहेत. लक्झरी बस पुण्याहून नागपूरकडे जात होती तर कार नागपूरकडून मेहकरकडे येत असताना भल्या पहाटे हा अपघात घडला. अपघातानंतर तात्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत पोहोचवली.
इतर महत्वाच्या बातम्या
उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर!
"हिम्मत असेल तर वांद्रे येथे येऊन दाखवा, शिवसैनिक सज्ज आहेत"; मातोश्रीसमोर जोरदार बॅनरबाजी