मलकापूरच्या आमदारांचा प्रताप! वाढदिवसाला रॅली काढली, गुन्हा दाखल केल्यानंतरही केली पेढ्यांची तुला
मलकापूर शहर पोलिसांनी काल दुपारी राजेश एकडेंसह नगराध्यक्ष हरीश रावळ, उपनगराध्यक्ष हाजी राशीद जमादार यांच्यासह 25 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे काल दुपारी दाखल केले होते
![मलकापूरच्या आमदारांचा प्रताप! वाढदिवसाला रॅली काढली, गुन्हा दाखल केल्यानंतरही केली पेढ्यांची तुला Buldhana Malkapur news update Rajesh ekade Birthday program celebration मलकापूरच्या आमदारांचा प्रताप! वाढदिवसाला रॅली काढली, गुन्हा दाखल केल्यानंतरही केली पेढ्यांची तुला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/16/2f6b5ece2f29f15bf661b7efcd98a44c_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मलकपूरचे काँग्रेस आमदार राजेश एकडे यांनी काल सायंकाळी संचारबंदी मोडीत काढून मलकापूरमध्ये रॅली काढून आपला वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे या रॅलीत लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. याबद्दल बातमी माध्यमातून झळकताच मलकापूर शहर पोलिसांनी काल दुपारी राजेश एकडेंसह नगराध्यक्ष हरीश रावळ, उपनगराध्यक्ष हाजी राशीद जमादार यांच्यासह 25 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे काल दुपारी दाखल केले होते.
गुन्हे दाखल झाले असतानाही आमदार राजेश एकडे यांना पोलीस आणि कायद्याची भीती नसल्याचं दिसून आलं. काल सायंकाळी मलकापूर तालुक्यातील घिर्णी या गावात प्रचंड गर्दी जमवून आमदार राजेश एकडे यांची पेढ्याची तुला करण्यात आल्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून वायरल झाला आहे.विशेष म्हणजे याही कार्यक्रमात लहान मुलांची लक्षणीय संख्या होती तर इथं उपस्थित असलेल्या लोकांच्या तोंडावर मास्क नावालाही दिसत नव्हता.
आमदार राजेश एकडे यांना कोरोना नियमांचा विसर पडलाय की काय असा सवाल उपस्थित होत आहे. गुन्हा दाखल झाला असतानाही त्यांनी परत एकदा असाच गुन्हा केला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सामान्यांचं काय..? असा सवाल उभा राहत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)