बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव (Buldhana khamgaon Latest news) येथील एका प्रेमीयुगलाने 25 ऑक्टोबर रोजी पळून जाऊन लग्न केले होते. यानंतर प्रेमीयुगुलाने लग्न करून काल रात्री परत येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जवाब देण्यासाठी हजेरी लावली. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन परिसरातच रघु विजय तिवारी या युवकाशी वाद घालून त्याच्यावर गुप्तीने प्राणघातक हल्ला केला.


यावेळी या युवकाच्या पोटात गुप्तीने वार करण्यात आले. यात रघु विजय तिवारी हा प्रेमी युवक गंभीर जखमी झाला असून त्यावर आधी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला सर्वोपचार रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. यावेळी पोलीस स्थानक परिसरातच हा हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह



इतर संबंधित बातम्या