Sindhutai Sakpal Death News : अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ( Sindhutai Sakpal passes away ) यांचं काल निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते. देशभरातून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
एक ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलं चांगल्या दर्जाचे आयुष्य जगू शकली. त्यांनी उपेक्षित लोकांसाठी खूप मोठं काम केलं आहे. त्यांच्या निधनाने अपार दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sindhutai Sapkal : 'नकुशी' असणारी चिंधी ते अनाथांच्या आयुष्याचं सोनं करणारी माय; असा होता सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास
- अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Sindhutai Sapkal : एका युगाचा अंत! अनाथांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या सिंधुताईंचा 750 हून अधिक पुरस्काराने सन्मान
- Sindhutai Sapkal : 'अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली', सिंधुताईंच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह