Coronavirus Omicron Variant : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron) संसर्ग लहान मुलांसाठी किची धोकादायक आहे, याबद्दल डॉक्टर निहार पारेख (Dr Nihar Parekh) यांनी सांगितलं आहे. निहार पारेख हे मुंबईमधील बालरोगतज्ञ आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी  लहान मुलांमध्ये ओमायक्रॉनचा धोका किती आहे? तसेच लहान मुलांमध्ये कोणती लक्षणं आढळू शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत. तसेच पालकांना देखील लहान मुलांची विशेष काळजी घेण्यास त्यांनी सांगितलं आहे. 


व्हिडीओमध्ये निहार यांनी सांगितले, 'गेल्या दोन अठवड्यात ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. ओमायक्रॉन रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मी तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती देणार आहे. तुमच्या मुलांना जर ताप, खोकला, कफ आणि घसा खवखवणे ही  कोरोना सदृश लक्षणं अढळली तर तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. मुलांमध्ये कोणतीही लक्षणं नसताना उगाच टेस्ट करू नका. तसेच जर लक्षणं दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरू करा. जर तुमच्या मुलाला 48 तासांपेक्षा जास्त वेळ ताप असेल तर बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला कोरोना टेस्ट करायची की नाही याबाबतीत माहिती देतील. बऱ्याच वेळा कोरोनाची टेस्ट करण्याची गरज भासत नाही. लहान मुलं 2 ते 3 दिवसांमध्येच बरी होतात. काळजी घेऊ नका.' 






कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली असताना दुसरीकडे शास्त्रज्ञांनी दिलासा देणारी बाब सांगितली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ डॉ. मोनिका गांधी यांनी म्हटले की, आपण सध्या पूर्णपणे वेगळ्या टप्प्यात आहोत. विषाणू हा नेहमीच आपल्यासोबत असतो. मात्र, या व्हेरियंटमुळे लोकांमधील रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल आणि त्यामुळे महासाथ आटोक्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


संबंधित बातम्या


Fact Check : अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने RTPCR टेस्ट केली बंद? जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागचं सत्य


Healthy Fruits : मधुमेह, हृदय आणि कर्करोगावर गुणकारी 'ड्रॅगन फ्रूट', फायदे जाणून घ्या


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह