Mumbai Corona Update : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनारुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज (मंगळवारी) देखील तब्बल 10 हजार 860 नवे कोरोनाबाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. पण सुदैवाने या नव्या आढळलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं नसल्याने ही एक दिलासादायक बाब आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार नव्या आढळलेल्या तब्बल 89 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत. तसचं या नव्या आढळलेल्या रुग्णांमध्ये कमी प्रमाणात रुग्णांना रुग्णालयात दाख करण्यात आले आहे. बाकी घरगुती विलगीकरणात उपचार घेत आहेत.


मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या आकडेवारीनुसार आज नव्याने आढळलेल्या 10 हजार 860 रुग्णांपैकी 9665 रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत. या सर्वांपैकी केवळ 864 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 864 पैकी 52 जणांनाच ऑक्सीजन पुरवण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेकडे असणाऱ्या 30 हजार 565 पैकी केवळ 4 हजार 491 खाटा वापरल्या गेल्या असून इतर बेड्स सध्यातरी शिल्लक आहेत. ज्यामुळे केवळ 14.7 टक्के बेड्सच वापरात असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान यामुळे मुंबई पालिका कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज असल्याचं समोर येत आहे.


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र घटले 


नव्याने समोर येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षण कमी असली तरी रुग्णवाढीचा दर मात्र वाढत आहे. सध्या 0.63 टक्के इतरा रुग्णवाढीचा दर असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. 98-99 टक्के असलेले हे प्रमाण आता 92 टकक्यांवर आले आहे. शिवाय रुग्ण दुपटीचा दरही 110 दिवसांवर गेला आहे.



असे झाल्यास मुंबईत लॉकडाऊन होणार


मुंबईत नवे 10 हजार 860 कोरोना रुग्ण आढळले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सोमवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून तो चिंतेचा विषय आहे. मुंबईत आजपर्यंत एकूण 7 लाख 52 हजार 012 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात सध्या 47 हजार 476 सक्रिय रुग्णसंख्या आहे. रुग्णदर दुप्पट होण्याचा कालावधी घटला असून तो 110 दिवसांवर पोहोचला आहे.  मुंबईत कोरोना रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियमानुसार मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha