एक्स्प्लोर
ट्रॅक्टर 42 फूट खोल विहिरीत पडून चालकाचा जागीच मृत्यू
ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे 42 फूट खोल विहिरीत पडून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडली आहे
बुलडाणा : शेतात ट्रॅक्टरद्वारे वखरणी सुरु असताना चालकाचं नियंत्रण सुटून ट्रॅक्टर 42 फूट खोल विहिरीत पडला. यामध्ये ट्रॅक्टरचालकाला जीव गमवावा लागला. बुलडाण्यात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुलडाण्यात देऊळगाव राजा तालुक्यातील पिंप्री आंधळे भागात ही घटना घडली. विकास आंधळे हे स्वतःच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणी करत होते. रात्री आठ वाजता शेतात ट्रॅक्टर चालवत असताना त्यांचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर थेट 42 फूट विहिरीत जाऊन पडला.
विहिरीत जवळपास 35 फूटांपर्यंत पाणी असल्यामुळे आंधळेंना हालचाल करता आली नाही. अपघातात विकास आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटना समजल्यावर ग्रामस्थांनी धाव घेऊन मोटरपंपाद्वारे विहिरीतील पाणी काढलं. त्यानंतर आंधळेंचा मृतदेह आणि ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement