छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी रस्त्यावर; बुद्धलेणी बचाव समितीचा महामोर्चा, नेमकं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या बुद्धलेणी बचाव समितीच्या वतीने आपल्या अनेक मागण्यासाठी आज महामोर्चा निघतो आहे. क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येत आहे.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस देण्यात आल्याचा प्रक्रर घडला होता. आता या प्रकरणाच्या विरोधात आज भिक्खू संघ, उपासक आणि आंबेडकरी समुदाय आक्रमक झाला असून त्यांनी या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. यासाठी शहरातील (Chhatrapati Sambhajinagar News) क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येत आहे.
या मोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी होणार असून, इतरधर्मीय नागरिकदेखील मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतील, असा दावा करण्यात आला आहे. तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सोबतच विद्यापीठ परिसरातील सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. बुद्धलेणी बचाव समितीच्या वतीने आपल्या अनेक मागण्यासाठी आज हा महामोर्चा निघतो आहे.
मोर्चात हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी
छत्रपती संभाजीनगरच्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्र हे अतिक्रमित असल्याचे सांगत महानगर पालिकेने नोटिस जारी केली होती. मात्र हे स्थळ तमाम बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरी समुदायासाठी पवित्र असे स्थान आहे.परिणामी, महापालिकेच्या कारवाईचा विरोध दर्शवण्यासाठी आज हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहे. हा लढा केवळ एका कारवाई विरोधातील नाही तर आमच्या अस्तित्वाचा असल्याचे सागत आज मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता प्रशासन नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगरातून 800 ज्येष्ठ नागरिक निघाले अयोध्येला
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत साठवर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना'सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला मान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाला आहे आणि नुकतेच या योजनेअंतर्गत येणाऱ्या भाविकांना जाणारी विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे.आणि या विशेष रेल्वेने जाण्याचा आनंद आठशे ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. यावेळी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शिक्षक आमदार विक्रम काळे हे उपस्थित होते.
हे ही वाचा