Sangli Crime : दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून नारळ सोलण्याच्या मशीनने भावाकडून सख्ख्या भावाची हत्या
Sangli Crime : दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून नारळ सोलण्याच्या लोखंडी मशीनने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी गावात घडली

Sangli Crime : दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून नारळ सोलण्याच्या लोखंडी मशीनने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी गावात घडली. या घटनेत यामध्ये वैभव अर्जून पवार (वय 38) यांचा मृत्यू झाला.
बलवडी येथील वैभव पवार यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला असून वैभवचा भाऊ विनोद अर्जून पवार (वय 24) यास विटा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद मयत अर्जूनची आई अलका पवार यांनी दिली आहे. सुरुवातीला आरोपीने त्याचा भाऊ हा चक्कर येवून पडल्याने त्याला रुग्णालयात नेल्याचा बनाव केला. परंतु, विटा पोलिसांनी शिताफीने तपास करत खूनाचा छडा लावला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम व त्यांच्या पथकाने भेट दिली. अधिक तपास पोलिस निरिक्षक संतोष डोके हे करीत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
