(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brinjal Farming : वांग्याच्या नवीन वाणांची निर्मिती, कमी खर्चात जास्त उत्पादन; रोखता येणार किटकांचा प्रादुर्भाव
Brinjal Farming : शास्त्रज्ञांनी वांग्याच्या वाणांच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. या वांग्याच्या नवीन जाती शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या असल्याचे सांगितले आहे.
Brinjal Farming In India : शेतीक्षेत्रात सातत्याने नवनवीन संशोधन होत आहे. संशोधनातून कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या वांग्याच्या वाणांची (Brinjal varieties) निर्मिती केली जात आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा होत असून, त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशातच आता शास्त्रज्ञांनी वांग्याच्या वाणांच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. या वांग्याच्या नवीन जाती शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या असून, यातून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे या नवीन वांग्याच्या जातींवर किटकांचा प्रादुर्भाव होणार नसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
'या' वांग्याच्या नवीन वाणांची निर्मिती
जालना (Jalna) जिल्ह्यातील बेजो शीतल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वांग्याचे नवीन वाण तयार केलं आहे. या कंपनीने कंपनीने 'जनक' आणि 'BSS 793' नावाची हायब्रीड वांग्याचे वाण विकसित केले आहे. येत्या काळात या वाणाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. कमी खर्चात वांग्याच्या या वाणातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती देखील शास्त्रज्ञांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना फायदेशीर
भारतीय कृषी संशोधन परिषदेने ट्रान्सजेनिक तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या तंत्राच्या साहाय्याने वांग्याच्या जनक आणि बीटी बीएस-793 या नवीन जाती विकसित केल्या आहेत. या प्रजातीमध्ये Bt जनुक, Cry1 FA1 जनुक वापरण्यात आले आहे. याचे IARI ने पेटंट देखील घेतले आहे. या तंत्राचा वापर करुन उत्तम दर्जाचा भाजीपाला तयार करता येत असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
उत्तम प्रकारची फळधारणा होते
बेजो शीतल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2005 मध्ये या तंत्रज्ञानाचा परवाना घेतला होता. उद्यान विज्ञान विद्यापीठ, बागलकोट, कर्नाटक यांना ही चाचणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे. विशेषतः अंकुर आणि फळ बोअरर ल्युसिनोड्स ऑर्बोनालिस सारख्या कीटकांच्या प्रतिकार करण्यासाठी या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रजातींबद्दल चांगली गोष्ट अशी आहे याचे बियाणे वाया जात नाही. उत्तम प्रकारची फळधारणा असल्याची माहितीही शास्त्रज्ञांनी दिली आहे.
शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली चाचणी करण्यात येणार
हायब्रीड वांग्याच्या वाणांची चाचणी घेण्याची विनंती मान्य झाल्यास त्याची चाचणी घेणे हे कंपनीचे पुढचे पाऊल असणार आहे. यासाठी कंपनी भारतातील जैवतंत्रज्ञान नियामक जेनेटिक इंजिनीअरिंग मूल्यांकन समितीशी संपर्क साधेल. वेळेवर मार्गदर्शक तत्त्वे मिळाल्यास खरीप हंगामातच विद्यापीठ स्तरावरुन नामनिर्देशित शास्त्रज्ञ किंवा पीक संवर्धकाच्या देखरेखीखाली एक हेक्टर क्षेत्रात चाचणी केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या: