Breaking News LIVE Updates : एनसीबी कारवायांबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार - नवाब मलिक
Breaking News LIVE Updates, 26 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. पण या प्रकरणातला पंच प्रभाकर साईल यानं लाचखोरीचे आरोप केल्यानं समीर वानखेडेच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. एनसीबीनं वानखेडेंची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनसीबीचं दक्षता पथक आजच मुंबईत दाखल होणार आहे आणि आजपासूनच चौकशी सुरु होणार आहे. दरम्यान, समीर वानखेडे मात्र काल तातडीनं दिल्लीला गेले आहेत. कार्यालयीन कामासाठी दिल्लीत आल्याची माहिती त्यांनी दिली होती. दरम्यान, या प्रकरणात मनी लाँन्डिंग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एनसीबीकडून होणारी चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या किंमत
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेली पेट्रोल-डिझेल दरवाढीनं महिना अखेरला थोडीशी उसंत घेतल्याचं चित्र आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झाला नाही. दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर उतार-चढाव पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 26 ऑक्टोबर रोजीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किंमती स्थिर आहेत. याआधी 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 107.59 रुपये आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर आज (25 ऑक्टोबर 2021) 113.46 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर दिल्लीत डिझेल 96.32 रुपये आणि मुंबईमध्ये 104.38 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. देशातील प्रमुख महानगरांबाबत बोलायचं झालं तर, मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. ऑक्टोबरमध्ये तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. एकीकडे कोरोना महामारीच्या संकटामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ बसत आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलची किंमत प्रति लीटर सहा रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलची किंमतही सात रुपयांनी वाढली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे.
सोलापुरातील आग आटोक्यात, दोषींवर कारवाई करणार: पालिका आयुक्त
साडेतीन तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे.इमारतीमध्ये फायर सिस्टीम होती मात्र मागच्या दहा वर्षात त्याला रिन्यू करण्यात आलं नाही. तसेच या इमारतीचे फायर ऑडिट देखील झालेले नाही. इमारतीच्या बेसमेंटचा वापर पार्किंगसाठी करण्याऐवजी त्या ठिकाणी साहित्यदेखील स्टोअर ठेवण्यात आले होते. हे सर्व कारण पाहता दोषींवर ती कारवाई करण्यात येईल असं पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी म्हटलंय. आग विजवण्यासाठी जवळपास 40 पाण्याचे बंब, तीन फोमचे बॅरल वापरण्यात आले.
एनसीबी कारवायांबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार - नवाब मलिक
मुंबई पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची चौकशी, खंडणी वसूली प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. योग्य ती कारवाई करण्याचं गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. पंच प्रभाकर साईल यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. एनसीबी कारवायांबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहेत - नवाब मलिक
सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील इमारतीत भीषण आग
सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील इमारतीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सेवन हेवन या इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागली असून संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं आहे.
सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील इमारतीत भीषण आग
सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील इमारतीत भीषण आग लागली आहे. सेवन हेवन या इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लो
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणातमनिष राजगरिया यांना पहिला जामीन मंजूर
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात पहिला जामीन मंजुर झाला असून मनिष राजगरिया यांना जामीन मिळाला आहे.