Breaking News LIVE : 31 मे पासून दिल्लीत बांधकाम आणि कारखाने पुन्हा सुरू करण्याची परवानगी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
Breaking News LIVE Updates, 28 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
Breaking News LIVE : पुणे जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
पुणे-नगर रोडवर वाघोली येथे असणाऱ्या एका मोठ्या फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. फर्निचरच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असून या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. वाघोली येथे घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल असूनअग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
गेल्या चार दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं आहे. तोक्ते चक्रीवादळाचा फटका, भाज्यांची कमी झालेली आवक तसेच कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम या सर्वांमुळे मुंबईत भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. आता येत्या 8 ते 10 दिवसात परिस्थिती पूर्ववत होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली ते डॉ. अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? याचं भाजपनने उत्तर द्यावे, ही भाजपाची मराठा समाजाशी गद्दारी नाही का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सिद्धार्थ पीठानी एनसीबीच्या ताब्यात. ट्रान्झिट रिमांडवर सिद्धार्थला मुंबईत आणणार
यंदाच्या वर्षीही आषाढी वारीवर कोरोनाचं सावट. पायी स्वरुपात यंदा पालखी सोहळा आयोजित करु द्या, पालखी सोहळा प्रमुखाची शासनाकडे मागणी
सातारा जिल्ह्यात एकूण 2529 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी उपचार घेऊन 1127 रुग्ण घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजअखेर 1 60,555 कोरोनाबाधित सापडले असून 1,32,990 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
चक्रीवादळाचा तडाखा शिवप्रभूंची शिवलंका म्हणून नावाजलेल्या मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्यालाही बसला. तोक्ते चक्रीवादळा मुळे किल्यावरील घरांची, वीज खांबांची झालेली पडझड, मोडून पडलेली झाडे आणि गेले अकरा दिवस विजे अभावी जीवन जगणाऱ्या सिंधुदुर्ग किल्लेवासीयांपर्यंत प्रशासन आजही बारावा दिवस उलटूनही पोहोचलेले नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा आषाढी वारी सोहळा कसा पार पाडायचा याबाबत आज पुण्यातील कौन्सिल हॉलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होतेय. या बैठकीला आळंदी देवस्थानसह सात प्रमुख पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलंय. मागील वर्षीचा पालखी सोहळा रद्द करावा लागला होता. मात्र यावर्षीचा पालखी सोहळा मर्यादित स्वरूपात का होईना पायी स्वरुपात पार पाडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी या पालखी सोहळा प्रमुखांनी एकमुखाने केलीय.
भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलसाठी आयसीसीने प्लेईंग कण्डिशन्सची आज घोषणा केली आहे. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा 'टाय' झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. ही कसोटी 18 ते 22 जून या कालावधीत इंग्लंडमधल्या साऊदम्प्टन खेळवण्यात येणार आहे. या कसोटीसाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसांत कोणत्याही कारणांनी खेळ वाया गेल्यास तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल. त्याबाबतचा निर्णय सामनाधिकारी आणि पंच मिळून 22 जूनला अखेरच्या तासात घेतील.
उल्हासनगर मधील कॅम्प क्रमांक एक भागात असलेल्या शक्ती सदन इमारती जवळील महानगरपालिकेच्या बाल उद्यानात गुरुवारी सायंकाळी एक खळबळजनक घटना घडली, गर्दुल्याने एका अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केलंय,या मुलीच्या नाक,हात ,छाती,तोंडावर गर्दुल्याने सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला
सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. मराठा सामाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची या आंदोलकांची मागणी आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे देखील या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणूकीसंबंधी आजची बैठक रद्द झाली असून निवडणूक आयोग-मनपा अधिकाऱ्यांमध्ये आता पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे.
पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जमीन खरेदी करणाऱ्यांपैकी मनोज शर्माही अटकेत आहे तर रविकांत ठाकूरचा शोध सुरु आहे. नगरसेवक लांडगे यांच्या आजोबांच्या नावे इंद्रायणी नगर येथील सर्व्हे नंबर 22 मध्ये 936 चौरस फूट जागा होती. मात्र 1985 साली त्यांना रीतसर मोबदला देऊन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने ही जागा ताब्यात घेतली होती. तीच जागा स्वतःच्या नावे आहे असं दाखवत नगरसेवक लांडगे यांनी ही जागा 2018 साली शर्मा आणि ठाकूरला विकली. या जागेसाठी 15 लाख 80 हजार रुपये देखील आकारले. आता या जागी एक इमारत ही उभी आहे. पिंपरी पालिकेकडून बनावट मिळकत कर पावती बनवून, त्या आधारे विद्युत विभागाकडून वीज कनेक्शन घेत शासनाची फसवणूक केली. म्हणून प्राधिकरणाने लांडगेसह तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांनी नगरसेवक लांडगे यांच्यासह शर्माला अटक केली असून ठाकूरचा शोध सुरु आहे.
लॉकडाऊन काळात सकाळी अकरानंतर हातगाड्यांवर विक्री करण्यास बंदी असताना देखील कल्याण पश्चिम नजीक मोहने लहुजीनगर परिसरात फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले होते. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे पथक या ठिकाणी कारवाईसाठी गेले असता फेरीवाल्यांनी महापालिकेच्या फेरीवाला पथकातील कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. इतकेच नव्हे तर काही फेरीवाल्यांनी या पथकावर दगडफेक केली. या हल्ल्यात पालिकेच्या गाडीच्या काचा फुटल्या तर फेरीवाले पथकातील कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत
मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 46,600 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,600 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव हा 71,400 रुपये इतका आहे.
मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून एका पुरवठादाराची माघार घेतली आहे. तर लसींच्या पुरवठ्यासाठी इतर 7 पुरवठादारांबरोबर चर्चा सुरु असली तरी त्यांनी अद्याप कोणत्याही आवश्यक कागदपत्र सादर केलेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या अडचणीत भर पडली आहे
पार्श्वभूमी
मुंबई महापालिकेच्या लसींच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून एका पुरवठादाराची माघार; पालिकेच्या अडचणीत भर
मुंबई महापालिकेनं कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं होतं. एक कोटी लसींचे डोस खरेदी करण्यासाठी 8 पुरवठादार आले होते. यातील एक पुरवठादार फायझर कंपनीची अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणार होता. परंतु, त्यांनं माघार घेतली आहे. कोणतंही कारण न देता फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे. दरम्यान, 7 पुरवठादारांबरोबर चर्चा सुरु असून कोरोनाची तिसरी लाट धडकण्याआधी प्रत्येक मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लस टोचण्याचे उद्दीष्ट असल्याचं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाने नुकसानच आहे, निषेध व्हायलाच हवा- डॉ. अभय बंग
दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाने नुकसानच आहे याचा निषेध विरोध व्हायला हवा अशी प्रतिक्रिा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी दिली आहे. हा निर्णय अत्यंत अयोग्य आणि दुर्दैवी असल्याची टीका करत अंमलबजावणी होत नसल्याने दारू बंदी उठवली हा अजब तर्क राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी लागू होणार का? असा थेट सवाल त्यांनी विचारला. कोरोना नियंत्रणाचे तीन-तेरा झाले, मग नियंत्रण थांबवायचे का? असा उद्विग्न सवालही त्यांनी विचारला. राज्य कल्याणकारी योजना राबवण्यासाठी दारूचा महसूल हवा हा कुतर्क, 1000 कोटी वैध तर 500 कोटी अवैध दारू महसूल कुणाच्या खिशात जाणार याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडलं.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्पुटनिक व्ही लस नागरिकांना दिली जाणार
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लस हे प्रमुख हत्यार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लसीकरण वेगाने करण्याची गरज आहे. मात्र देशातील लसीची उपलब्धता आणि नागरिकांची संख्या यांच्यात मोठी तफावत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मात्र रशियाची लस 'स्पुटनिक व्ही' ही येत्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लोकांना उपलब्ध होणार आहे. अपोलो रुग्णालयाने गुरुवारी ही माहिती दिली आहे.
अपोलो रुग्णालयाचे कार्यकारी उपाध्यक्ष शोभना कामिनी यांनी सांगितले की, भारत सरकारने ज्या तिसऱ्या लसीच्या परवानगी दिली आहे ती स्पुटनिक व्ही लस जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून लोकांना दिली जाणार आहे. देशभरातील अपोलो रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -