Breaking News LIVE : पंतप्रधान सहाय्यता निधीतून मराठवाड्याला पाठवलेल्या नादुरुस्त व्हेंटिंलेटर्सची औरंगाबाद खंडपीठाकडून गंभीर दखल
Breaking News LIVE Updates, 25 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात सोमवारी 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज, तर 22,122 नवीन रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात सोमवारी (24 मे) 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 22,122 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल 361 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. राज्यात सध्या एकूण 3,24,580 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.51 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,32,77,290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,02,19 (16.83 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 27,29,301 व्यक्ती होम क्वॉरन्टीन असून 24,932 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरन्टीन आहेत.
स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन लस घेता येणार; मुंबई महापालिकेकडून गाईडलाइन्स जारी
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिनांक 19 मे 2021 रोजी निर्गमित केलेल्या सुचनांनुसार, स्तनदा मातांनाही कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन नोंदणी करणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांना कोविड लस देण्यात येणार आहे. स्तनदा मातांना लस देताना योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याची दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रं तसेच वैद्यकीय माहिती महिलांनी समवेत बाळगणे आवश्यक आहे. आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या विविध पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येते. त्यामध्ये आता स्तनदा मातांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांचे लसीकरण केंद्रामध्ये जागेवरच नोंदणी करुन लागलीच त्यांना लस देण्यात येईल.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढवण्यासाठी लगतच्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करा; मुख्यमंत्र्यांचा आदेश
मागील काही दिवसांमध्ये वन्य प्राणी आणि मानवामधील संघर्षाच्या घटना वाढल्याचं दिसून आलं होतं. मानवी वस्त्यांमध्ये नव्य प्राण्यांचा वावरही चिंतेत टाकणारी बाब. याच मुद्द्यावर आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष टाकलं आहे. सध्या महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून आताच्या घडीला राज्यात 312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्यातच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने लगतच्या दोन गावांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत वनविभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
'माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो' : खासदार संभाजीराजे छत्रपती
माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य दौरा सुरु केला असून आज ते सोलापुरात होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहोत. हा दौरा कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी मला चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करतोय. लोकांना काय वाटतेय यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठीच मी हा दौरा सुरु केलाय, असं ते म्हणाले.
मुंबईत मागील 24 तासात 1,037 रुग्णांचे निदान, तर 1427 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 37 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत मागील 24 तासात 1,037 रुग्णांचे निदान, तर 1427 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 37 रुग्णांचा मृत्यू
पंतप्रधान सहाय्यता निधीतून मराठवाड्याला पाठवलेल्या नादुरुस्त व्हेंटिंलेटर्सची औरंगाबाद खंडपीठाकडून गंभीर दखल
मराठवाड्याला पाठवलेल्या नादुरुस्त व्हेंटिलेटर्सची आज औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली, पंतप्रधान सहाय्यता निधीतून हे सगळे व्हेंटिलेटर पाठवण्यात आले होते हे वेंटीलेटर ज्या सप्लायर ला पाठवले त्याच्याबाबत काय कारवाई केली असा सवाल कोर्टानं केंद्राला केलाय
कोर्टाने माध्यमात आलेल्या बातम्यांची दाखल घेतलीये त्यात मराठवाड्याला जे 150 व्हेंटिलेटर्स आले होते त्यापैकी 37 व्हेंटिलेटर्स अजून उघडलेच गेले नाहीत तर उर्वरित सगळेच व्हेंटिलेटर्स खराब असल्याचं बातम्यात सांगण्यात आलं होत यांची कोर्टाने दाखल घेतलीये
हा सगळा प्रकार फार गंभीर असल्याचं कोर्टाने नोंदवला आहे, व्हेंटिलेटर्स हे जीव वाचवणारे आहेत, नादुरुस्त व्हेंटिलेटर्स रुग्णांचा जीव घेणारे ठरू शकतात असेही कोर्ट म्हणाले, additional सॉलिसिटर जनरल ला व्हेंटिलेटर्स दुरुस्तीबाबत काय विचारणा केली असा सवाल ही कोर्टाने केला... तर नेत्यांनी व्हेंटिलेटर्स प्रकरणात लक्ष घालू नये आपण त्यातील तज्ञा नाहीत असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले
15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचं आयोजन 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येण्याची शक्यता आहे.
IPL 14: BCCI looking at September 15 to October 15 window to complete league
— ANI Digital (@ani_digital) May 25, 2021
Read @ANI Story | https://t.co/91onB0Ar2D pic.twitter.com/ssT9dxkpxv
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन, काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण, कांताबाई सातारकर तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई, अहमदनगरमधील संगमनेरमध्ये झालं निधन
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच संगमनेरमध्ये निधन
तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच संगमनेरमध्ये निधन. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.