Breaking News LIVE : मुंबईत उद्या, रविवारी कुठल्याही लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही : BMC

Breaking News LIVE Updates, 22 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 May 2021 10:44 PM
कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल होणार,  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या रविवारपासून सुरू होता कडक लॉकडाऊन,   राज्य सरकारच्या लॉकडाऊनचे नियम मात्र कायम राहणार   

अपवादात्मक परिस्थिती वगळता सोलापुरातील ग्रामीण भागात होम आयसोलेशनला बंदी

सोलापूर- अपवादात्मक परिस्थिती वगळता सोलापुरातील ग्रामीण भागात होम आयसोलेशनला बंदी,


होम आयसोलेशनमध्ये असलेल्या लोकांची यादी करून त्यांना इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन सेंटरमध्ये स्थलांतर करणार,


त्यासाठी प्रत्येक गावातच व्यवस्था तयार करण्याच्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना,


आलसोलेशसाठी गावातील शाळा, मंदिर, मंगलकार्यालय अशा राहण्यायोग्य ठिकाणचा वापर करण्याच्या सूचना

सातारा जिल्ह्यात आणखी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी

सातारा जिल्ह्यात आणखी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी,


वाढत्या आकडेवारीमुळे सातारा जिल्हाधिकारी यांचा निर्णय,


किराणा, भाजी दुकानांसह जिल्ह्यातील सर्वच दुकाने बंद,


25 मे पासून ते 1 जून पर्यंत कडक निर्बंध लागू,


लग्न आणि अंत्यविधीला जाणासाठी आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक,


तसेच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्रही बंधनकारक,

मुंबईत उद्या, रविवारी कुठल्याही लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही : BMC

मुंबईकरांनो, उद्या (23मे, 2021 ) कुठल्याही लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. 24 मे, सोमवार च्या लसीकरणाची माहिती उद्या देण्यात येईल, असं बीएमसीकडून कळवण्यात आलं आहे.

ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण उद्या रविवारी बंद

ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण उद्या रविवार दिनांक 23 मे 2021 रोजी बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असं ठाणे मनपाकडून कळवण्यात आलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल होणार, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या रविवारपासून सुरू होता कडक लॉकडाऊन, जिल्हा प्रशासनाकडून थोड्याच वेळात घोषणा होणार, राज्य सरकारच्या लॉकडाऊनचे नियम मात्र कायम राहणार

मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केली आहे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची केवळ थट्टा करण्याचं काम केंद्र सरकारने आणि भाजपने केलं असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मोदींच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली आहे. केंद्र सरकारचा ढिसाळपण, नियोजन शून्यता, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांचे पालन न करणे यामुळे देशाची स्मशानभूमी बनली आहे. कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात देशाच्या पंतप्रधानांवर जागतिक पातळीवर टीका करण्यात येत असल्याची टीका नाना पटोले यांनी केलीय.  

बेळगावात दोन दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात, शहर स्तब्ध

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊन सुरु असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील फिल्डवर उतरले आहेत. डीसीपी डॉ.विक्रम आमटे हे स्वतः शहरातील चौकात थांबून बंदोबस्तावर नजर ठेवून आहेत. शहरात सकाळपासूनच सगळीकडे शुकशुकाट दिसून आला. लॉकडाऊन काळात सगळी दुकाने बंद ठेवण्यात आली असून केवळ दूध विक्री केंद्रे आणि औषध दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडायला परवानगी देण्यात आली आहे. शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. सगळीकडे पोलीस मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले असून रस्त्यावर जाणाऱ्या आणि येणाऱ्यांची कसून चौकशी केल्या शिवाय सोडले जात नाही. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची वाहने जप्त करण्यात येत आहेत. होलसेल भाजी मार्केट आणि शहरात नव्याने उघडण्यात आलेली तीन मार्केट शनिवार आणि रविवार बंद राहणार आहेत.

अॅफकॉनच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- आशिष शेलार

बार्ज दुर्घटनेप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. अॅफकॉनच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री संवेदनशील असल्यामुळं त्यांनी जनतेला न्याय द्यावा असा आर्जवी सूर आळवला. 

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले व निर्याती अभावी पडून असलेले  टरबूज फोडून नांदेडमधील शेतकऱ्याने व्यक्त केला संताप

लॉकडाऊनमुळे उत्पादित केलेल्या टरबूजांची निर्यात करता येत नसल्यामुळे आर्थिक नुकसानीत आलेल्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील टरबूज फोडून सरकारकडे न्याय मागितला. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील शेतकऱ्याने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले व निर्याती अभावी पडून असलेले टरबूज फोडून संताप व्यक्त केलाय.

आंतरराष्ट्रीय अंपग बॉस्केटबॉलपट्टूने दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशिन

कोरोनामुळे सर्वत्र ऑक्सिजन ची कमतरता निर्माण झाली होती, मात्र आता बुलढाणा जिल्हा सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी बरेच मदतीचे हात पुढे येतांना दिसत आहेत. आंतराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉलपट्टू जावेद चौधरी यांनी बुलढाना जिल्ह्यातील लोणार कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन भेट दिले आहेत. 

संगीतकार रामलक्ष्मण यांचे नागपुरात निधन, ते 79 वर्षांचे होते.

पांडू हवालदार, आली अंगावर, राम राम गंगाराम , पथ्थर के फुल, मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है.. हमसे बढकर कौन आदी 75 पेक्ष्या जास्त चित्रपटांना संगीत.  राम कदम आणि विजय पाटील या जोडीने संगीत द्यायला सुरुवात. राम 1977 ला गेले मग विजय यांनी रामलक्ष्मण नावाने संगीत द्यायला सुरुवात केली.  

मनुष्यवधाची जबाबदारी वादळावर टाकू नका- संजय राऊत

Cyclone tauktae  मनुष्यवधाची जबाबदारी वादळावर टाकू नका. हा निसर्गाचा प्रकोप नव्हे, मनुष्यवधच. देशातील गृहमंत्री राज्यांशी संवाद साधत वादळाच्या तयाचीचा आढावा घेत आहेत आणि या कंपन्यांना वादळाची सुचनाही नाही, संजय राऊत यांचा सवाल  

चोरीच्या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीचा आमगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत मृत्यू 

चोरीच्या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीचा आमगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडलीय. दोन दिवसांपूर्वीच एका चोरीच्या घटनेत तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील मुख्य आरोपी राजकुमार (30 वर्षे) हा काल रात्री मृत पावला असून हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इतक्या वेगात दौरा करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही, मनसे नेते संदीप देशपांडे यांची उपहासात्मक टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपहासात्मक टीका केली आहे. "मी ट्वीटमधून सीएमवर टीका करत नाही, वादळ किती वेगाने आलं 140-160...मुंबई सिंधुदुर्ग किती किमी आहे? किती वेळात ते जाऊन आले. वादळपेक्षा वेगाने दौरा मुख्यमंत्री यांनी केला की नाही? याचं कौतुक केलं मी. ऋषीमुनी कसे मनोवेगाने फिरायचे, क्षणात इकडून तिकडे तसा दौरा त्यांनी केला...किती कौतुकास्पद आहे. आतापर्यंत इतके सीएम पाहिले पण इतका वेगात दौरा करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. त्यामुळे हे वर्ल्ड बेस्ट सीएम म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

15 दिवसांपासुन सुरू असलेल्या इंधन दरवाढीला ब्रेक 

मागच्या 15 दिवसांपासून सुरू असलेली इंधन दरवाढ आज थांबलीये. त्यामुळे आजच्या दिवशी पुरता का होईना सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागच्या 15 दिवसांमध्ये पेट्रोलचे दर हे 2 रुपये 36 पैसे तर डिझेल चे दर 2 रुपये 87 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल पाठोपाठ डिझेलही लवकरच शंभरी पार करण्याची शक्यता आहे.सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल हे परभणीत असून पेट्रोल 101.71 रुपये तरडिझेल 91.93 रुपये या दराने विक्री केले जात आहे..केवळ उस्मानाबाद आणि सोलापुर या दोन जिल्ह्यात पेट्रोल ने अद्याप शंभरी गाठलेली नाहीये.

कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक

कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक. WHO च्या आपक्तालीन लसींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश नाही 

राज्यातल्या 21 जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यांपेक्षा खाली

राज्यातल्या 21 जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यांपेक्षा खाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपुरात पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आला आहे. सर्वत्र मुंबई पॅटर्नचं कौतुक करण्यात येत आहे. 


 


 

नट बोल्टवरुन पोलिसांचा तपास, जेजुरीत चोरलेलं एटीएम काही तासात सापडलं

जेजुरीमध्ये चोरीला गेलेले एटीएम पोलिसांनी काही तासात शोधून काढले. एटीएम मशीनच्या एका नट-बोल्टवरुन पोलिसांनी हा तपास केल्याने जवळपास 25 लाख रुपयांची रोकड असलेले एटीएम  सुखरुप मिळालं आहे. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री एटीएम पळवून नेले होते. या एटीएममध्ये जवळपास 25 लाख रुपयांची रोकड होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना नीरा बाजूला एका रस्त्यावर एटीएमचे नट बोल्ट सापडले, त्यावरुन त्यांनी तपास सुरु केला. अखेर एका ओसाड रानात दगडांमध्ये हे एटीएम असल्याचे आढळून आले. चोरट्यांनी एटीएममधील पैसे काढण्यासाठी तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज आणि काही लोकांच्या माहितीवरुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यात यश मिळाले नाही पण पैशांनी भरलेले एटीएम सापडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेजुरी पोलिसांच्या टीमचे कौतुक केले आहे.

पार्श्वभूमी

राज्यात शुक्रवारी 44,493 रुग्णांना डिस्चार्ज तर 29,644 नवीन कोरोना रुग्णांचं निदान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी (21 मे) 44493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29644 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत एकूण 5070801 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.74% एवढे झाले आहे. राज्यात काल 555 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32441776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5527092 (17.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2794457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 367121 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासन जबाबदार : औरंगाबाद खंडपीठ
ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही अथवा ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासनास जबाबदार धरण्यात येईल, अशी दुरुस्ती ऑर्डर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी केली आहे. खंडपीठाने 19 मेच्या आदेशात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न व औषध विभागाचे सचिव सौरभ विजय आणि चार नोडल अधिकारी यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल. ऑक्सिजनचा आवश्यक पुरवठा केला नाही तर हे अधिकारी वैयक्तिक कारवाईस पात्र ठरतील, असे म्हटले होते.


चक्रीवादळ, नुकसान आणि मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा... मदतीपासून कुणीही वंचित राहणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (22 मे) कोकण दौरा करत नुकसानीची पाहणी केली.  सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होऊ द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही  असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज म्हटलं आहे. 



गडचिरोलीत 13 नक्षल्यांना कंठस्नान, गृहमंत्री वळसे पाटलांचा गडचिरोली दौरा, पोलिसांचं केलं कौतुक
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सहा पुरुष आणि सात महिलांसह 13 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या संपूर्ण अभियानाचे कौतुक करत गडचिरोली पोलीस दलाला प्रोत्साहन दिले आहे. शुक्रवारी (21 मे) सकाळी पैडी भागात झालेल्या एका मोठ्या चकमकीत 60 ते 70 नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार सुरु केला. पोलीस दलाने त्याचा जोरदार प्रतिकार केला. यात पोलीस दलाचा दबाव बघता नक्षलवादी घटनास्थळावरुन पसार झाले. घटनास्थळाची चकमकीनंतर पाहणी केल्यावर 13 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. यात सहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. या सर्वांची ओळख पटवणे सुरू आहे. घटनास्थळावरुन एके-47- एस एल आर रायफल -303  रायफल, कार्बाइन ,12 बोअर रायफल -मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.