एक्स्प्लोर

Breaking News LIVE : द वायकिंग क्रुझेस ब्रिटिश आर्ट 2021 स्पर्धेत कोल्हापूरच्या कन्येला पारितोषिक

Breaking News LIVE Updates, 17 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : द वायकिंग क्रुझेस ब्रिटिश आर्ट 2021 स्पर्धेत कोल्हापूरच्या कन्येला पारितोषिक

Background

Maharashtra Corona Update : दिलासा...! राज्यात काल (रविवारी) 59,318 रुग्णांना डिस्चार्ज, तर 34,389 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला असून दिवसेंदिवस कोरोनाचा आलोख उतरणीला लागला आहे. राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज तब्बल 59 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज नवीन 34 हजार 389 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 974 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत 48,26,371 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 4 लाख 68 हजार 109 सक्रीय रुग्ण आहेत. 

फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रुप धारण केलं आहे. त्यामुळे ही लढाई आता मोठी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता फॅमिली डॉक्टरांना आवाहन केले आहे. कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी "माझा डॉक्टर" म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. या डॉक्टरांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, की आपल्या सगळ्यांना माहित आहे की जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो. आपल्याला आपल्या त्या माझ्या डॉक्टरवर म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरवर खुप विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते, घरातल्या लोकांचे आजार माहित असतात.

Tauktae Cyclone : तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा; केरळ, कर्नाटक, गोव्यानंतर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

रविवारी केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात तडाखा बसल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ उत्तरेकडे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. वाटेत महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही याचा परिणाम जाणवणार आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यायासह जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान समुद्रामध्ये उंच लाटा उसळल्या होत्या. चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळ तोक्ते येत्या 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत ते गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि महुवा दरम्यान किनाऱ्ययावर येण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. गुजरातमधील सखल भागातील सुमारे सव्वा लाख लोकांना हलवण्यात आले आहे. तर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद बल (एसडीआरएफ) ची  54 पथके तैनात करण्यात आली आहेत.

19:56 PM (IST)  •  17 May 2021

द वायकिंग क्रुझेस ब्रिटिश आर्ट 2021 स्पर्धेत कोल्हापूरच्या कन्येला पारितोषिक

द वायकिंग क्रुझेस ब्रिटिश आर्ट 2021 स्पर्धेत कोल्हापूरच्या कन्येला पारितोषिक. रिचा राजेश वोरा हिच्या 'मॉर्निंग आफ्टर' या चित्राला द्वितीय पारितोषिक. लग्नानंतर रिचा वोरा इंग्लंडमध्ये स्थायिक आहे, रिचावर कौतुकाचा वर्षाव.

19:30 PM (IST)  •  17 May 2021

पिंपरी चिंचवड शहरासाठी लसींचा साठा उपलब्ध झाला नाही, त्यामुळे उद्या ही शहरात लसीकरण होणार नाही

पिंपरी चिंचवड शहरासाठी लसींचा साठा उपलब्ध झाला नाही, त्यामुळे उद्या ही शहरात लसीकरण होणार नाही.

16:41 PM (IST)  •  17 May 2021

को-विन ॲपवर स्पुटनिकचा पर्याय दिसू लागला आहे. को-विन अॅप अपग्रेड केल्यानंतर पर्याय उपलब्ध

को-विन ॲपवर स्पुटनिकचा पर्याय दिसू लागला आहे. को-विन अॅप अपग्रेड केल्यानंतर पर्याय उपलब्ध.

16:31 PM (IST)  •  17 May 2021

पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल साडे सहा कोटींचे रक्तचंदन ताब्यात घेण्यात आलंय

पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल साडे सहा कोटींचे रक्तचंदन ताब्यात घेण्यात आलंय. 6.4 टन इतक्या वजनाचे हे रक्तचंदन ताब्यात घेण्यात आलं. वाकड पोलिसांच्या नाकेबंदीत ही मोठी कारवाई पार पडली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली.

15:52 PM (IST)  •  17 May 2021

कराड तालुक्यातील साकुर्डी येथील खळबळजनक घटना, नदीपात्रात तीन जिवंत बॉम्ब सापडले

कराड तालुक्यातील साकुर्डी येथील खळबळजनक घटना. नदीपात्रात तीन जिवंत बॉम्ब सापडले. मासेमारी करणाऱ्या युवकाचा जाळ्यात आले बॉम्ब. तिनी बॉम्ब प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवले होते. पोलीस घटनास्थळी दाखल.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election Exit Poll : केजरीवालांच्या आपची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यताCity 60 News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 05 Feb 2025 : ABP MajhaDelhi Vidhan Sabha Election Exit Poll : बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाजSuresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि  गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
Embed widget