Breaking News LIVE : राज्यात आजही नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त
Breaking News LIVE Updates, 11 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
राज्यात लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणामही राज्यात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना आकडेवारीत घट दिसून येत आहे. मात्र तरीही रोज जवळपास 40-50 हजार कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळेच लॉकडाऊन आता 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 15 मे नंतर आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
मोठा दिलासा! राज्यात सोमवारी 61,607 रुग्ण बरे होऊन घरी, तर नवीन 37,326 रुग्णांचे निदान
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झालेला मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 37,326 रुग्णांचे निदान झाले आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा 40 हजारांच्या खाली आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आज राज्यापालांची भेट घेणार!
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (11 मे) संध्याकाळी पाच वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे, ते पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत सांगितलं होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता हा मुद्दा थेट राष्ट्रपतींकडे मांडत आहेत.
पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. इतर राज्यात देखील पत्रकारांना असा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली.
पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. इतर राज्यात देखील पत्रकारांना असा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली.
मराठा समाजाला उल्लू बनवणे या सरकारने थांबवावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मराठा समाजाला उल्लू बनवणे या सरकारने थांबवावे, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मराठा समाजाची दिशाभूल करण्याची हास्यास्पद कृती, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, गेले सहा महिने राज्यपालांना शिव्या दिल्या आणि आता नम्रपणे निवेदन द्यायला गेले
राज्यात आजही नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त
दिलासादायक! राज्यात आजही नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त. आज 71 हजार 966 रुग्णांना डिस्चार्ज तर 40 हजार 956 नवे कोरोनाबाधित.