Breaking News LIVE : Maharashtra लातूर शहरासह निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसामध्ये आजपासून पुढील आदेशापर्यंत रात्रीची संचारबंदी लागू

Breaking News LIVE Updates, 3 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Mar 2021 11:38 PM
पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता. शांताबाई राठोड यांचा गंभीर आरोप. पूजाच्या कुटुंबावर केला आरोप. माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा. शांताबाईंचा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना आवाहन
रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील जमीन घोटाळ्या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची मागणी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवार आणि रवींद्र वायकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी. किरीट सोमय्या फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात तक्रार करणार
बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे. जारकीहोळी यांच्या सीडीमुळे कर्नाटकातील विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महापालिका आणि उदगीर, औसा, निलंगा तसेच अहमदपूर नगरपालिका हद्दीत आजपासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री 11.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या आदेशात अत्यावश्यक/जीवनावश्यक सेवा (वैद्यकीय सेवा, मेडिकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था) यांना सूट देण्यात आलेली आहे. कोविड-19 प्रतिबंधात्मक आणि सुरक्षा नियम शारीरिक अंतर, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता इत्यादी नियमांचे कोटेकारेपणे पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897, अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 च्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असंही आदेशात म्हटलं आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील उजणी शिवारात तोडणीला आलेला ऊस जळून खाक झालाय. यात शेतकऱ्यांच 60 ते 70 हजार रुपयांच नुकसान झालाय. उजणी शिवारात हजारे आणि सापनर कुटुंबियांची शेती आहे, त्यात त्यांनी 60 गुंठ्यावर ऊसाची लागवड केली आहे. साखर कारखानामध्ये जाण्यासाठी पुढील दोन चार दिवसांत ऊसाची तोडणी केली जाणार होती, परन्तु रात्री अचानक ऊसाने पेट घेतला, आजूबाजूचया शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग विझवल्यानं पुढील नुकसान टळलं आहे, 60 गुंठे पैकी 30 गुंठ्यावरील शेतीच नुकसान झालंय.
बेळगावजवळील भूतरामनहट्टी येथील राणी चन्नमा प्राणी संग्रहालयात तीन आशियाई सिंह दाखल झाले असून आणखी पंधरा दिवसात वाघ, बिबटे, अस्वल आदी प्राणी आणले जाणार असल्याची माहिती आमदार सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांना दिली. आमदार सतीश जारकीहोळी यांनी प्राणी संग्रहालयाला भेट देवून पत्रकारांशी संवाद साधला. प्राणी संग्रहालयाच्या कामाला गती आली असून
एकूण पन्नास कोटीचा निधी प्राणी संग्रहालयासाठी मंजूर झाला आहे. त्यापैकी चौदा कोटी रुपये खर्च झाले आहेत. शंभर एकर जागेत टायगर सफारी सुरु करण्यात येणार आहे. वाघ, सिंह आणि बिबटे यांच्याबरोबर अन्य प्राणी देखील संग्रहालयात आणले जाणार आहेत. दोन महिन्यात हे प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात येणार आहेत. हे प्राणी संग्रहालय दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि गोव्यातून येणाऱ्या जनतेचे आकर्षण ठरणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोना काळात साहित्य खरेदीत 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केला आहे. मास्क, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, बेड असं साहित्य अव्वाच्या सव्वा रकमेने खरेदी करण्यात आलं आहे. काही राजकीय मंडळींच्या नातेवाईकांना पोसण्यासाठी आयत्या वेळी तयार झालेल्या फर्मकडून ही खरेदी झाल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी निंबाळकर यांनी केला आहे. कोरोना काळात झालेल्या या साहित्य खरेदीच्या लेखापरीक्षणातील अनेक त्रुटी लेखापरीक्षकांनी स्पष्टपणे निदर्शनाला आणून दिल्या आहेत. या सर्व भ्रष्टाचाराची कॅगमार्फत चौकशी करण्याची मागणी राजवर्धन निंबाळकर यांनी केलीय. राज्य सरकारने जर याची दखल घेतली नाही तर प्रसंगी जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन लढाई लढू असा इशारा देखील यावेळी निंबाळकर यांनी दिला आहे. या घोटाळ्यात सामील असणाऱ्या राजकीय मंडळी आणि अधिकाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचा दावा करत राजवर्धन निंबाळकर यांनी खळबळ उडवून दिली आहे.
एका कुख्यात गुन्हेगाराला अटक करुन पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस अंबरनाथ पोलिसांनी जप्त केली आहेत. संजय पाटील असे या गुन्हेगाराचं नाव असून त्याच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे पिस्तुल आले कुठून आणि ती जवळ बाळगण्याचा त्याचा उद्देश काय होता याचा पोलीस तपास करत आहेत.

मुंबई : मुंबईत आज सकाळी साधारण 9 च्या सुमारास आपल्या घरुन गोरेगाव फिल्म सिटीत शुटींग करता जाणाऱ्या अभिनेता अजय देवगणच्या गाडी समोर गोरेगाव येथे अचानक एक व्यक्ती आली. अजय देवगण विरोधात प्रदर्शन करु लागला. "दिल्लीत इतके दिवस झाले, शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांचे तू समर्थन का केले नाही? त्यांच्या समर्थनात तू ट्वीट का केले नाही? असं बोलत जवळपास 15 मिनिटे या व्यक्तीने अभिनेता अजय देवगणची गाडी रोखून धरली होती. हा सर्व प्रकार अनेकजण पाहत होते, मात्र कोणाच यावेळेस अभिनेता अजय देवगण याच्या मदतीला धावले नाही तसेच त्या व्यक्तीचे म्हणणे काय आहे? हे देखील अजय देवगणने माहिती करुन घेतले नाही. शेवटी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आणि घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या राजदीप सिंग याला ताब्यात घेवून अभिनेता अजय देवगण याची गाडी गोरेगाव फिल्म सिटीपर्यंत सोडली तसेच चौकशी करुन अभिनेता अजय देवगण यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजदीप सिंग आहे. यासंदर्भात अधिक तपास दिंडोशी पोलीस करत आहेत.
अकोला जिल्ह्यातील अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे पाच कोटींची खंडणी मागितली आहे. भारसाकळे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात राहतात. त्यांच्या निवासस्थानी हे पत्र पाठविण्यात आलंय. 5 कोटी न दिल्यास त्यांच्या मुलाला ठार करणाची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दर्यापूर पोलीस पत्राचा तपास करतायेत.
जालना : गेल्या 24 तासात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 122 ने वाढली, तर 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, सध्या जिल्ह्यात एकूण 819 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू

Maharashtra औरंगाबाद News-



सातवीत शिकणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

आई वडील बाहेर गेल्यानंतर घराच्या पहिल्या मजल्यावर केली आत्महत्या..

संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या 14 वर्षीय मुलीचे नाव आहे.

रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली घटना..

आत्महत्येचे कारण समोर आले नसून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या भरती परिक्षेत गैरव्यवहार झाले असल्यास परिक्षा तत्काळ रद्द करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत केली. या भरतीप्रकरणी कंपनी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पवार यांनी नमूद केले
बीड जालना महामार्गावर असलेल्या वेअर हाऊस ला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 75 कोटी रुपयांचा कापूस आणि गाठाण जळून भस्म झाल्या आहेत .रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग दहा आटोक्यात आली..
बीड पासून जवळच असलेल्या जप्ती पारगाव परिसरात शासकीय वेअर हाऊस आहे .या ठिकाणी शासनाने खरेदी केलेल्या तब्बल 21 हजार पेक्ष्या जास्त कापूस गाठणी आणि खाजगी व्यापाऱ्यांच्या सहा ते सात हजार कापूस गठाणी होत्या .ज्याची मार्केट किंमत 75 कोटींच्या आसपास आहे .
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क पदभरतीसाठी नुकत्याच झालेल्या परिक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे , यासंदर्भात वस्तुस्थिती तपासून आवश्यकता भासल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल आणि वेळ पडल्यास या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत दिली.

यासंदर्भात भाजपाचे विनायक मेटे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला ते उत्तर देत होते .या परीक्षेच्या वेळी गोंधळ झाला नाही असं एकही केंद्र नाही,पेपर फुटले गेले आहेत. ज्या संस्थेकडे हे काम दिलं होतं त्या संस्थेमुळे हा गोंधळ झाला असं सांगत ही परीक्षा रद्द करून पून्हा घ्यावी अशी मागणी मेटे यांनी केली.

नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत वेगवेगळ्या समस्या,

लसीकरण केंद्रवर गर्दी वाढल्याने सोसिअल डिस्टंसिंगचा फज्जा,

अनेक तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने वृद्ध नाराज.. मनपाने योग्य व्यवस्था केली नाही, कर्मचारी उर्मट वागतात असे आरोप..

मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे उर्मट उत्तर.. म्हणे लोकं सोशल डिस्टंसिंग पाळणे शिकले नाहीत
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बैलगाडी वरून विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेटवर बैलगाडी आल्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन का देतोय याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी इशा झा याही होत्या. आमदार माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या विषयांवरून चर्चेत होते. त्यांनी मागील काही महिन्यापूर्वी राजकारण सोडून देण्याची घोषणा केली होती. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारणात सक्रिय होणार असल्याची माहिती दिली आणि आज थेट विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदनाचे गठ्ठे घेऊन बैलगाडीवरून पोहोचले.
लातूर जिल्ह्यातील हटकरवाडी येथे विजेची तार तुटून साडेपाच एकर वरील ऊस जळून खाक झाला आहे. हटकरवाडी येथे विजेची तार तुटून शॉट सर्किट झालं यामुळे उसाच्या पिकाला आग लागली. या आगीत साडेपाच एकर वरील उभा ऊस जळून गेला आहे. यात सात शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे . याची माहिती प्रशासनाला मिळताच तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा च्या सूचना केल्या. पंचनामा करून तात्काळ अहवाल सादर करण्यास संदर्भातल्या सूचनाही देण्यात आले आहेत.
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या कडूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालघर चे जिल्हाधिकारी माणिक गुरसल यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मास्क वापर करा , सॅनिटायझर चा वापर करा अशी आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी आपल्या भाषणातून करतात तसच पालघर मध्ये सध्या 50 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आदेश असताना देखील शिवसेना खासदार राजेंद्र गावित हे या सगळ्याची पायमल्ली करताना दिसून आले . मुरबे येथील एका विकास कामाची पाहणी करताना खासदार यांच्या तोंडावर मास्क नसल्याचा प्रकार समोर आलाय त्यातच खासदार यांच्या भोवती त्यांच्या कार्यकर्त्यांनचा मोठा गराडा पाहायला मिळाला . त्यामुळे सामान्य नागतिकांना वेगळा न्याय आणि खासदारांना वेगळा न्याय का असा सवाल सध्या पालघर करत आहेत.
कोरोना लसीकरणाच्या तिसरा टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहरातील महानगरपालिकेच्या काही रुग्णालयात यासाठी लसीकरण केंद्र तयार करण्यात आले. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.अॅपवरून नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्यात येत असली तरी रुग्णालयातही नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.. सोमवारी ही लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने covid-19 च्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचा भंग झाला होता.. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही याठिकाणी झाले नव्हते. त्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांना काही वेळ मनस्ताप सहन करावा लागला. परंतु आता मात्र महापालिका प्रशासनाने या सर्व अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असून हळूहळू नागरिकांच्या तक्रारी कमी होत आहे..



साताऱ्यातील सासवड जवळील घटना आहे. मुंबई - पुणे - सोलापूर अशी भारत पेट्रोलियमची पाईपलाईन आहे. ही आठ दिवासापुर्वी आज्ञाताने फोडली. त्यातून सुमारे 2 हजार लिटर पॕट्रोल वाहून गेले. चोरट्यांनी पॕट्रोल चोरून नेहले मात्र मोठ्या प्रमाणात पॕट्रोल जमिनीत मुरले. याचा परिणाम आजू बाजूच्या शेतीवर आणि विहिरींवर दिसत आहे. काहिंची शेतीही खराब झाली आहे. या बाबत लोणंद पोलिस ठाण्यात आज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे पाच कोटींची खंडणी मागितली आहे. भारसाकळे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात राहतात. त्यांच्या निवासस्थानी हे पत्र पाठविण्यात आलंय. 5 कोटी न दिल्यास त्यांच्या मुलाला ठार करणाची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दर्यापूर पोलीस पत्राचा तपास करत आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणपतीपुळे येथील अंगारकी चतुर्थीनिमित्त होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय गणपतीपुळे संस्थानानं घेतला आहे. दरम्यान यावेळी होणारी संभाव्य गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेतल्याचं गणपतीपुळे संस्थानानं स्पष्ट केलं आहे. यादिवशी मंदिर देखील पूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तरी भाविकांसह सर्वांनी याला साथ द्यावी असं आवाहन देखील संस्थानानं यावेळी केलं आहे.
सांगली जिल्ह्यातल्या 15 पोलीस ठाण्याच्या
हद्दीतील पकडलेला गांजा व ब्राऊन शुगर हा अंमली पदार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार नष्ट करण्यात आला. यामध्ये एकूण 1 टन 154 किलो गांजा व 25 ग्रॅम 54 मिली ब्राऊन शुगर इतका सुमारे सव्वा कोटींचा अंमली पदार्थाचा साठा पेटवून नष्ट केला गेला. खंडेराजुरी येथील गोळीबार मैदान येथे हा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेशन, रासायनिक विश्लेषक तसेच पंचांच्या साक्षीने कार्यवाही केली. यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबले देखील उपस्थित होते. जिल्ह्यातल्या 15 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी कारवाई करून अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. यामध्ये जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे पकडली होती. जिल्ह्यातून एकूण 1 टन 151 किलोचा गांजा पकडण्यात आला होता. तर 25 ग्रॅम ब्राऊन शुगर
पकडण्यात आली होती. सदरचा हा मुद्देमाल एकूण सव्वा कोटी रुपयांचा होता.


बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसरा डोस घेण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले 18 दिवसांपूर्वी कोरोना लस घेतल्यानंतर ही बीडचे डॉ. आर. बी. पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या ते रुग्णालयात दाखल असून प्रकृती स्थिर आहे. डॉ. पवार यांनी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णलयात लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेतली होती. दुसरा डोस घेण्यापूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोल्हापुरातील हॉटेलमध्ये पाल सापडल्याचा प्रकार बनावट,

ग्राहकांनी स्वतः पाल खाण्याच्या थाळीत आणून टाकल्याचा हॉटेल मालकाचा दावा,

या संदर्भातील पुरावा म्हणून सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हवाली करणार,

हॉटेलची बदनामी करणाऱ्या तरुणांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार- हॉटेल मालक
लष्कर भरती पेपरफुटीप्रकरणी दोन लष्करी कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

पुण्यात होणाऱ्या रिलेशन आर्मी भरती परीक्षेचा पेपर देण्याचे आमिष दाखवून पैसे विकल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने आणखी चार जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यामध्ये दोन लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांचा समावेश आहे. मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर होणारी रिलेशन आर्मी भरती परीक्षा रद्द करण्यात आली.
पुण्यात होणाऱ्या रिलेशन आर्मी भरती परीक्षेचा पेपर देण्याचे आमिष दाखवून पैसे विकल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने आणखी चार जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यामध्ये दोन लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांचा समावेश आहे. मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर होणारी रिलेशन आर्मी भरती परीक्षा रद्द करण्यात आली.
नंदुरबार तालुक्यातील राखीव जंगल आसलेल्या ठाणे पाडा जंगलात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मोठा वणवा पेटला असून आगीने भीषण रूप धारण केलं आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात वन संपत्तीचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे .स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाच्या जवान आगीवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.या जंगलात मोठ्या प्रमाणात मोर आणि इतर वन्यजीवांना धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ही आग जंगलात पसरत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे.
आज पासून जलयुक्त शिवारची खुली चौकशी. लोकांना कांही तक्रारी असतील तर दस्तऐवज आणि पुराव्यासह उपस्थित राहण्याच्या सूचना

पार्श्वभूमी

आरोपींनी पळ काढलेली इनोव्हा गाडी मुंबईतच? पोलिसांकडून कसून तपास


भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान असलेल्या अँटिलियापासून हाकेच्या अंतरावर चार दिवसांपूर्वी स्फोटक असलेली गाडी ठेवण्यात आली होती. मात्र यामागे कोण आहे? हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षा रक्षकांचे जबाबही याप्रकरणी नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणी 700 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. 10 पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत.


 


आज अंगारकी चतुर्थी, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी


गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाची असणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आज आहे. ही 2021 या नव्या वर्षातील पहिली संकष्टी. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना आहे. या दिवशी मंदिरांमध्ये गर्दी असते मात्र आज कोरोनामुळं ही गर्दी तुलनेनं कमी पाहायला मिळणार आहे.


 


राज्य सरकारचा सर्वाधिक निधी कर्जफेडीसाठी, पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल 16,200 कोटींची तरतूद


राज्य सरकारचा सगळ्यात जास्त निधी हा कर्जफेडीसाठी जात असल्याचे चित्र आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागणी मांडल्या. त्यात कर्जफेडीसाठी मोठ्या रकमेची तरतुद केल्याचे चित्र आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात सादर केलेल्या 21 हजार 076 कोटींच्या पुरवणी मागण्यात कर्जफेडीसाठी तब्बल 16 हजार 200  कोटींची तरतुद केली आहे.





इयत्ता 10 वीची परीक्षा 5 मे तर 12 वीची परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू होणार


काउंसिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने दहावी (ICSE) आणि बारावी (ISC) परीक्षा 2021 च्या तारखांची घोषणा केली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 5 मे पासून आणि इयत्ता 12 वीची परीक्षा 12 एप्रिलपासून सुरू होईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.