Breaking News LIVE : राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत
Breaking News LIVE Updates, 18 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा
आजपासून सुरू होणार्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्या 11 खेळाडूंची घोषणा केली. अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाचं आंदोलन स्थगित नाही, 21 जूनला समन्वयकांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ : संभाजीराजे
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर मूक आंदोलनाची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर आज मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र राज्यभरात होणारे आंदोलन अद्याप स्थगित केले नाही. अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास सव्वा दोन तास मराठा समाजाचं शिष्टमंडळ आणि सरकारच्या प्रतिनिधींनीमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे बोलत होते.
राज्यात सध्या 1,39,960 अॅक्टिव्ह रुग्ण, गुरुवारी 9,830 नवे कोरोनाबाधित
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. गुरुवारी 9,830 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5,890 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 236 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारी एकूण 1,39,960 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांसाठी होणार सुरु
महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांसाठी होणार सुरु,
शनिवारपासून संपूर्ण महाबळेश्वर पाचगणीचे पर्यटन सर्वांसाठी खुले,
नियम आणि अटी लागू करुन सुरु करण्याचा वाई प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय,
पर्यटकांची दांडेघर नाक्यावरच होणार रॅपिड अॅन्टीजेन तपासणी,
तर हॉटेल व्यावसायिक कर्मचारी यांना करावी लागणार प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी,
निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना महाबळेश्वर पाचगणीत दिली जाणार एन्ट्री
प्रांताधिकारी संगिता राजापुरे – चौगुले यांनी घेतली होती बैठक
महाबळेश्वरातील हिरडानाका येथे झालेल्या बैठकीत निर्णय
राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची समिती गठित
राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची समिती गठित,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठीत,
या समितीत उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांचा समावेश,
परिवहन विभागाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही समिती सूचना करणार,























